बघा : ‘मोहनजोदडो’मधील मंत्रमुग्ध करणारी चानी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:41 IST2016-07-05T14:11:26+5:302016-07-05T19:41:26+5:30
‘मोहनजोदडो’ चित्रपटाचा ट्रेलर आपण नुकताच बघितला आणि सोशल मीडियावर तो जाम हिट झाला. हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची ...

बघा : ‘मोहनजोदडो’मधील मंत्रमुग्ध करणारी चानी...
‘ ोहनजोदडो’ चित्रपटाचा ट्रेलर आपण नुकताच बघितला आणि सोशल मीडियावर तो जाम हिट झाला. हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची म्हणूनच प्रेक्षकांना चांगलीच प्रतीक्षा लागलीय. या चित्रपटाचे नवे स्टिल आज रिलीज झाले. यात पूजाचा लूक एकदम हटके आहे. पूजाने चित्रपटात चानी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर हृतिक सरमनच्या भूमिकेत आहे. हृतिक ‘मोहनजोदडो’ या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचतो आणि येथे पोहोचल्यावर या जागेशी आपले पूर्वजन्माचे नाते आहे, असे त्याला जाणवते. याच ठिकाणी त्याची भेट चानी हिच्याशी होते आणि यादरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलते. चानी ही राजा माहम या क्रूर राजाची मुलगी असते. यानंतर सरमन मोहनजोदडोला माहमच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी लढतो, अशी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आहे.