​पाहा, अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही...‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 13:13 IST2017-04-10T07:41:46+5:302017-04-10T13:13:55+5:30

श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता संपलीय. होय, आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

See, action, romance everything ... 'Half Girlfriends' trailer launches! | ​पाहा, अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही...‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च!

​पाहा, अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही...‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च!

रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता संपलीय. होय, आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुंबईच्या एका थिएटरमध्ये अर्जुन कपूर,श्रद्धा कपूर यांच्यासह दिग्दर्शक मोहित सूरी, निर्माती एकता कपूर आणि लेखक चेतन भगत यांच्या उपस्थितीत ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा व अर्जुन प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या ट्रेलरमध्ये अर्जुन व श्रद्धाचा एक लिपलॉक सीन्स दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला कालच सांगितले होते. आम्ही खरे सांगितले की खोटे, हे पाहण्यासाठी तुम्हाला ट्रेलर बघावाच लागेल.


ALSO READ : श्रद्धा कपूरने करिअरसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रद्धाने या चित्रपटात एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. श्रद्धाचा हा अंदाज अर्जुनला हैरान करून सोडतो, असे ट्रेलरमध्ये दिसतेय. यापूर्वी चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘ये हाफ गर्लफ्रेन्ड क्या होती है?’ असा प्रश्न अर्जुन विचारताना दिसला होता. ट्रेलरमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळणे अपेक्षित होते. पण असे न होता ऊलट अर्जुनचे सगळेच मित्र या प्रश्नाने बेजार झालेले दिसताहेत. येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहांत झळकणार असलेल्या या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे.   या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे.   बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. 

Web Title: See, action, romance everything ... 'Half Girlfriends' trailer launches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.