Trailer2 Out : ‘जीनियस’ घेणार ‘हॅपी’, ‘लैला मजनू’सह अनेकांशी पंगा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 21:18 IST2018-08-13T21:16:38+5:302018-08-13T21:18:02+5:30
गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलचा मुलगा 'जीते'च्या भूमिकेतून अभिनेता उत्कर्ष शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Trailer2 Out : ‘जीनियस’ घेणार ‘हॅपी’, ‘लैला मजनू’सह अनेकांशी पंगा!!
गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलचा मुलगा 'जीते'च्या भूमिकेतून अभिनेता उत्कर्ष शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे मुलगा उत्कर्षला 'जीनियस' चित्रपटातून लाँच करणार आहेत. आज या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर पहिल्या ट्रेलरपेक्षा अगदी हटके आहे. १ मिनिट ५५ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये उत्कर्ष देशाच्या शत्रूंशी लढताना दिसतोय. अॅक्शनसोबतचं या ट्रेलरला रोमान्सचाही तडका देण्यात आला आहे.
‘जीनियस’चे ट्रेलर सोशल मीडियावर हिट आहे. पण या चित्रपटाच्या बॉक्सआॅफिस कलेक्शनचा मार्ग मात्र जरा कठीण दिसतोय. होय, कारण उत्कर्ष शर्माच्या या डेब्यू सिनेमाच्या रिलीजच्या मुहूर्तालाचं एकूण लहान-मोठे सहा चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. येत्या २४ आॅगस्टला ‘जीनियस’ रिलीज होत आहे. नेमक्या याच दिवशी सोनाक्षी सिन्हाचा ‘हॅपी फिर भाग जाऐगी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इम्तियाज अली यांचा ‘लैला मजनू’ हाही याच दिवशी बॉक्सआॅफिसवर झळकणार आहे. केवळ हे दोनचं सिनेमे नाहीत तर रीड्रम, व्हेन ओबामा लव्ड ओसामा, पाखी आणि करीम मोहम्मद हे सिनेमेही या तारखेला बॉक्सआॅफिसवर धडक देणार आहेत. म्हणजे, बॉक्सआॅफिसवर मेगा क्लॅश पाहायला मिळणार आहे. साहजिकच चित्रपटांच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. ‘जीनियस’च्या कमाईलाही यामुळे फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उत्कर्षने मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅलिफोर्नियात सिनेमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूयॉर्कमधील ली स्टार्सबर्ग थिएटर अॅण्ड फिल्म इन्स्टिट्युटमधून पदवी घेतली व मग, त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायचे ठरविले. नवाजुद्दीन यात निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. 'जीनियस' चित्रपटातून इशिता चौहान ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.