सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू कुणासोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 19:19 IST2016-12-16T19:19:27+5:302016-12-16T19:19:27+5:30
सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानच्या पदरात अद्याप एकही चित्रपट नसला तरी देखील ती ...

सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू कुणासोबत?
सारा अली खान करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ दी इअर २’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल अशा बातम्या झळकल्या होत्या. मात्र काही दिवसातच साराने तिची आई आणि तिच्या पीआर कंपनीमुळे या करणच्या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतले. यावर मीडियात बरीच चर्चा झाली. यानंतर ती हृतिकच्या अपोझिट डेब्यू करेल अशी चर्चा रंगली. मात्र आत ती फिकी पडली आहे. सारा व शाहरुखचा मुलगा आर्यन खान एकत्र डेब्यू करणार ही बातमी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी लिहिलेल्या एका लेखातून या बातमीचा जन्म झालाय.
मसंद यांनी लिहिलेल्या लेखानुसार करण जोहर आपल्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये नव्या जोडीचा डेब्यू करणार आहे. करण जोहरने सारा अली खान हिला थोडे दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या डोक्यात एक मोठी कल्पना आहे असे सांगितले आहे. करण जोहर शाहरुख खानचा मुलगा आर्यन व साराला एकत्र लॉंच करण्याचा विचार करीत आहे. आर्यन सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.
याबातमीला दुजोरा देण्याचे काम आर्यनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमुळे झाले आहे. आर्यने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट नुकतेच डिलीट केले आहे. काही खाजगी कारणांमुळे आर्यनने आपले सोशल मीडियावरील अकाऊंट डिलीट केले. मात्र स्टार होण्याआधी आर्यनने मीडियापासून दूर राहवे असे शाहरुखला वाटत असल्याचे सांगण्यात येते.