'सरबजीत' पाकिस्तानविरोधी नाही - रणदीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 17:28 IST2016-05-05T11:58:18+5:302016-05-05T17:28:18+5:30

'सरबजीत' हा सिनेमा पाकिस्तानविरोधी असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे.  मात्र सरबजीत हा सिनेमा मानवता धमार्चा संदेश देणारा असल्याचं अभिनेता ...

'Sarabjit' is not anti-Pakistan - Randeep | 'सरबजीत' पाकिस्तानविरोधी नाही - रणदीप

'सरबजीत' पाकिस्तानविरोधी नाही - रणदीप

'
;सरबजीत' हा सिनेमा पाकिस्तानविरोधी असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे.  मात्र सरबजीत हा सिनेमा मानवता धमार्चा संदेश देणारा असल्याचं अभिनेता रणदीप हुडानं म्हटलं आहे. रणदीप या सिनेमात सरबजीत सिंग यांची भूमिका साकारतोय. सिनेमात कट्टर पाकविरोध दाखवण्यात आल्याचा त्यानं इन्कार केला आहे. सरबजीत हा सिनेमा कैद्याच्या जीवनावर आधारित आहे. "एखाद्या कैद्याला कैदी म्हणून नाही तर दुस-या देशाचा नागरिक म्हणून त्रास देणं हे चुकीचं आहे.. मग ते पाकिस्तान असो किंवा भारत'" असं रणदीपनं म्हटलं आहे. सरबजीत सारखे कैदी भारत आणि पाकिस्तानमधल्या राजकारणाचा आणि संबंधातील चढउतारांचा बळी ठरत असल्याचं रणदीपनं म्हटलं आहे.

Web Title: 'Sarabjit' is not anti-Pakistan - Randeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.