सारे जहां से अच्छा : कसे वाटते आमिर खानच्या नव्या चित्रपटाचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 13:00 IST2016-12-15T12:53:55+5:302016-12-15T13:00:11+5:30

‘दंगल’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असताना आमिर खानने पुढील प्रोजेक्टस् फायनल करण्यास सुरूवात केली आहे. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माच्या ...

Sara Jahan Hai: How is the name of Aamir Khan's new film? | सारे जहां से अच्छा : कसे वाटते आमिर खानच्या नव्या चित्रपटाचे नाव?

सारे जहां से अच्छा : कसे वाटते आमिर खानच्या नव्या चित्रपटाचे नाव?

ंगल’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असताना आमिर खानने पुढील प्रोजेक्टस् फायनल करण्यास सुरूवात केली आहे. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनावर आधारित चित्रपटात आमिर प्रमुख भूमिका करणार हे तर निश्चित झाले आहे. महेश मथाई दिग्दर्शित या बायोपिकचे आता नावसुद्धा निश्चित झाले.

‘सारे जहां से अच्छा’ असे या चित्रपटाचे नाव असेल. नावावरून तरी हा चित्रपट देशभक्तीने ओतप्रोत असणार असे दिसतेय. निर्मात्यांसमोर ‘सारे जहां से अच्छा’ आणि ‘सॅल्युट’ या दोन नावांचा पर्याय होता. परंतु पहिले नाव लोकांना चांगलेच परिचित असल्याने व त्याच्याशी जुळलेल्या भावनांमुळे हे नाव अंतिम करण्यात आले.  

अंतराळ सफर करणाऱ्या राकेश शर्माला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी विचारले होते की, ‘अवकाशातून भारत कसा दिसतो?’ यावर त्याने उत्तर दिले होते, ‘सारे जहां से अच्छा!’ 

महेश मथई यांनी यापूर्वी भोपाळ वायूगळीतीवर आधारित ‘भोपाल एक्सप्रेस’ (१९९९) हा चित्रपट बनवलेला आहे. रॉनी स्क्रुवाला यांच्या ‘आरएसव्हीपी’ या नव्या बॅनरअंतर्गत हा सिनेमा प्रोड्यूस केला जात आहे. परंतु बॉलीवूडमधील पहिली स्पेस फिल्म म्हणून या चित्रपटाला मान मिळणार नाही. 


भारताचा पहिला अंतराळवीर :  राकेश शर्मा

कारण त्यापूर्वी सुशांतसिंग राजपूत अभिनित ‘चंदा मामा दूर के’ ही काल्पनिक अंतराळवीरावर आधारित फिल्म येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक संजय पुरणसिंग चौहान करणार असून नावजुद्दिन सिद्दिकीचीदेखील यामध्ये भूमिका असल्याचे सांगितले जातेय. 

‘दंगल’नंतर आमिर यशराज बॅनरच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्थान’ची शूटींग सुरू करणार आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच तो अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. ‘धमू ३’ फेम विजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित हा सिनेमा २०१८च्या दिवाळीला रिलीज होणार आहे. त्यानंतर आमिर राकेश शर्मा बायोपिकवर काम सुरू करणार आहे. सध्या आमिरने दाढी वाढवलेली असून तो ‘ठग्स आॅफ हिंदूस्थान’चा लूक असेल असे सांगण्यात येतेय.

तत्पूर्वी आमिर त्याचा मॅनेजर अद्वैत चौहाणच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्येसुद्धा एक छोटीशी भूमिका करणार असून त्याची शूटींगसुद्धा पूर्ण झाली आहे. म्हणजे पुढील दोन वर्षांसाठी तो प्रचंड व्यस्त राहणार. यावर्षाचा शेवट त्याच्या ‘दंगल’ सिनेमाने होणार असून यामध्ये तो पहेलवान महावीर सिंग फोगट यांची भूमिका करीत आहे. ‘मंगल पांडे’ आणि ‘दंगल’नंतर ‘सारे जहां से अच्छा’ हा आमिरचा तिसरा बायोपिक ठरणार.

Web Title: Sara Jahan Hai: How is the name of Aamir Khan's new film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.