सारा अली खानचा 'हा' बिकिनी फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 23:38 IST2017-05-17T14:58:03+5:302017-05-17T23:38:57+5:30

अभिनेता सैफ अली खान याची मोठी मुलगी सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. साराने अद्यापपर्यंत भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू ...

Sara Ali Khan's 'Ha' Bikini photo is getting viral! | सारा अली खानचा 'हा' बिकिनी फोटो होतोय व्हायरल!

सारा अली खानचा 'हा' बिकिनी फोटो होतोय व्हायरल!

िनेता सैफ अली खान याची मोठी मुलगी सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. साराने अद्यापपर्यंत भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसेल तरीसुद्धा ती तिच्या बिकिनीवरून चर्चेत आहे. कारण बिकिनीमधील साराचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती निर्माता विकास गुप्ता याच्यासोबत पोज देताना दिसत आहे. 

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या लाडक्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये साराने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रंगाची बिकिनी घातलेली असून, ती निर्माता विकास गुप्ता याच्याबरोबर पोज देण्यासाठी उभी आहे. विकासने साराचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्याने तो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

वास्तविक विकासने फोटो अपलोड केल्याच्या काही मिनिटानंतर फोटो डिलीटही केला होता. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारण हा फोटो क्षणार्धातच सर्वदूर व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यातच विकास एका हॉटेलमध्ये सारासोबत स्पॉट झाला होता. त्याचठिकाणी त्याने हा फोटो क्लीक केला असावा. मात्र साराचा अशाप्रकारे शेअर केलेला फोटो तिला आवडला काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. 



काही दिवसांपूर्वीच साराची आई अमृता सिंग हिने जाहीर केले होते की, सारा अली खान तिची आजी शर्मिला टागोर हिच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. तिला डेब्यू चित्रपटात बिकिनी शॉट देण्याची गरज नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. अशात विकाससोबतचा साराचा हा फोटो अमृताला कितपत पचनी पडेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

सध्या साराची बॉलिवूड डेब्यूवरून जोरदार चर्चा रंगत आहे. असे म्हटले जात आहे की, सारा धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत बनविल्या जात असलेल्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. मात्र अद्यापपर्यंत याविषयी अधिकृत घोषणा केली नसल्याने ही केवळ चर्चा आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अशीही चर्चा समोर येत आहे की, सलमान खानची बहीण अर्पिता हिचा पती आयुष याच्याबरोबर ती बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे. 

त्याचबरोबर साराविषयी अशीही चर्चा रंगत आहे की, ती शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याला डेट करीत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच तिला सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर याच्यासोबत डिनर डेटवर बघण्यात आल्याने, या चर्चांमधील नेमके तथ्य काय? असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यावेळी या दोघांचे डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 

Web Title: Sara Ali Khan's 'Ha' Bikini photo is getting viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.