सारा अली खानने शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो, पाहा हा आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 17:53 IST2021-02-19T17:48:31+5:302021-02-19T17:53:43+5:30

सारा अली खानने इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये एका मुलाचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे.

Sara Ali Khan shared a photo of Mystery Man, see who is this? | सारा अली खानने शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो, पाहा हा आहे तरी कोण?

सारा अली खानने शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो, पाहा हा आहे तरी कोण?

ठळक मुद्देया फोटोतील मुलाने गुलाबी रंगाची ‘IGGY 7’ नावाची जर्सी परिधान केली आहे. या फोटोसोबत हा मुलगा कोण आहे ते ओळखा पाहू असे साराने लिहिले आहे. 

सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सारा अली खानने इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये एका मुलाचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा मिस्ट्री मॅन कोण आहे असा प्रश्न नेटिझन्सना पडला आहे. या फोटोतील मुलाने गुलाबी रंगाची ‘IGGY 7’ नावाची जर्सी परिधान केली आहे. या फोटोसोबत हा मुलगा कोण आहे ते ओळखा पाहू असे साराने लिहिले आहे. 

सारा खानच्या आयुष्यातील हा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नाही तर तिचा लाडका भाऊ इब्राहिम आहे. इब्राहिम हा खूप चांगला क्रिकेटर आहे. इब्राहिमचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी हे भारतातील अतिशय दिग्गज क्रिकेटर होते. इब्राहिमला त्याच्या आजोबांप्रमाणे क्रिकेटची आवड आहे. तो अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर क्रिकेट खेळतानाचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. 

सारा आणि इब्राहिम या भावा-बहिणींच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला नेहमीच एकमेकांचे फोटो पाहायला मिळतात. 

सारा अली खान स्टारकिड असली तरी अल्पावधीतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचेही लाखो लोक आज दिवाने आहेत. साराने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. तिचा कुली नं 1 हा चित्रपट काहीच महि्न्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: Sara Ali Khan shared a photo of Mystery Man, see who is this?