'या' तारखेला रिलीज होणार सारा अली खान आणि सुशांत सिंगचा 'केदारनाथ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 14:35 IST2017-07-11T07:38:07+5:302017-07-11T14:35:59+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान स्टारर केदारनाथ चित्रपटाताची रिलीज टेड फायनल करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये ...

Sara Ali Khan and Sushant Singh's 'Kedarnath' will be released on this date | 'या' तारखेला रिलीज होणार सारा अली खान आणि सुशांत सिंगचा 'केदारनाथ'

'या' तारखेला रिलीज होणार सारा अली खान आणि सुशांत सिंगचा 'केदारनाथ'

शांत सिंग राजपूत आणि सारा अली खान स्टारर केदारनाथ चित्रपटाताची रिलीज टेड फायनल करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांने चित्रपटाच्या रिलीजची तारीख ट्वीट केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने एका इंटरव्ह्यु दरम्यान सांगितले होते की, ''या चित्रपटाबाबत आता मी खूप काही सांगू इच्छित नाही मात्र ही एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. केदरानाथसाठी साराची करण्यात आलेली निवड अगदी योग्य आहे.''   

याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करायला सारा अली खान तयार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूडमध्ये डेब्यूची चर्चा होती.सारा ही बी टाऊनमधल्या पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची ती कन्या आहे. करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर २’मधून डेब्यू करणार यानंतर ती ऋतिक रोशन आणि सलमान खानच्या मेहुणा आयुष शर्मासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र सगळ्यांना चर्चांचा पूर्णविराम देत ती सुशांत सिंगसोबत झळकणार असल्याचे कंर्फम झालायं. नुकतेच या चित्रपटाची सुरुवात अभिषेक कपूरने उत्तराखंडमधील केदारनाथ या धर्मस्थळापासून केली आहे. यावेळी त्याच्यासोबत सारा अली खानसुद्धा होती. केदारनाथचे दर्शन आणि मंदिरातील सकाळच्या आरतीसाठी दोघेही हजर होते.  

सुशांत सिंग राजपूत हा चंदा मामा दूर के या चित्रपटात ही झळकणार आहे. याचित्रपटाच्या तयारीसाठी तो नासाला जाणार आहे. यात तो एक अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. 

Web Title: Sara Ali Khan and Sushant Singh's 'Kedarnath' will be released on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.