​सारा अली खान अन् सुशांत सिंह राजपूतची जमणार जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 10:15 IST2017-05-23T04:45:11+5:302017-05-23T10:15:11+5:30

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरु आहे. कधी ती हृतिक ...

Sara Ali Khan and Sushant Singh Rajput! | ​सारा अली खान अन् सुशांत सिंह राजपूतची जमणार जोडी!

​सारा अली खान अन् सुशांत सिंह राजपूतची जमणार जोडी!

फ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून सुरु आहे. कधी ती हृतिक रोशनसोबत बॉलिवूड डेब्यू करणार अशी बातमी येते तर कधी हर्षवर्धनसोबत दिसणार, असे ऐकायला मिळते.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध निमार्ते-दिग्दर्शक तिला चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी करण जोहरने साराला त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटासाठी साईन केले अशी चर्चा होती. यानंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉईज’ या चित्रपटात ती झळकणार असल्याची बातमी आली.  प्रत्यक्षात या सगळ्या बातम्या अफवाच निघाल्या. पण आता बॉलिवूडच्या गोटातून आणखी एक बातमी आली आहे. होय, सारा अली खान हृतिक, हर्षवर्धन यांच्यासोबत नाही तर सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे.



सुशांत सिंह राजपूत पुन्हा एकदा ‘काई पो चे’ दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत काम करणार आहे. सारा अली खान या चित्रपटासाठी राजी असल्याचे कळतेय. सुशांत आधीपासूनच अभिषेकसोबत काम करणार होता. मात्र त्याच्याकडे डेट्स नव्हत्या. पण आता अभिषेकच्या चित्रपटात सुशांत दिसणार हे नक्की आहे. हा चित्रपट एक लव्हस्टोरी असेल. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. अभिषेकला या चित्रपटासाठी एक  फ्रेश जोडी हवी होती. त्यामुळे त्यांनी सारा अली खानला यात कास्ट करण्याचा विचार केला. साराने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि तिलाही ती आवडली. येत्या दोन आठवड्यात सारा हा चित्रपट साईन करण्याचीही शक्यता आहे. असे झाले तर सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा संपणार आहे.

Web Title: Sara Ali Khan and Sushant Singh Rajput!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.