सारा अली खान आणि कार्तिक आर्यान एकत्र दिसणार 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 17:33 IST2018-11-01T17:32:05+5:302018-11-01T17:33:31+5:30

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथ अजून रिलीज झाला नाही तर अजून साराकडे सिनेमांची लाईन लागली आहे.

Sara Ali Khan and Kartik Aryan will be seen together in this director's film! | सारा अली खान आणि कार्तिक आर्यान एकत्र दिसणार 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात!

सारा अली खान आणि कार्तिक आर्यान एकत्र दिसणार 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात!

ठळक मुद्देकेदारनाथचा टीझर बघून इम्तियाज अलीने सारा अली खानला अप्रोच केले आहे

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथ अजून रिलीज झाला नाही तर अजून साराकडे सिनेमांची लाईन लागली आहे. 'केदारनाथ' शिवाय ती रोहित शेट्टीची 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार तिला इम्तियाज अलीच्या नव्या सिनेमाची ऑफर मिळाली आहे.         
केदारनाथचा टीझर सगळ्यांच खूप आवडला आहे. यातील सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. केदारनाथचा टीझर बघून इम्तियाज अलीने सारा अली खानला अप्रोच केले आहे. इम्तियाज अलीने सारा अली खानसोबत आपल्या सिनेमाबाबत चर्चादेखील केली आहे. रिपोर्टनुसार इम्तियाज अलीला सारा अली खानने होकार देखील दिला आहे. मात्र अजून कोणतिही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. साराच्या अपोझिट यात कार्तिक आर्यन दिसणार आहे. 

‘केदारनाथ’बाबत बोलायचे झाले तर यात सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.
 

Web Title: Sara Ali Khan and Kartik Aryan will be seen together in this director's film!