​सपना चौधरीचे ‘हट जा ताऊ’ वादात! १६ जणांना बजावले नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 12:06 IST2018-02-20T06:36:23+5:302018-02-20T12:06:23+5:30

‘बिग बॉस11’ची एक्स कंटेस्टंट आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. होय, हरियाणाचा लोकप्रीय गायक विकास ...

Saptana Chowdhury's 'Hat Ja Tau' debate! Notice to 16 people! | ​सपना चौधरीचे ‘हट जा ताऊ’ वादात! १६ जणांना बजावले नोटीस!

​सपना चौधरीचे ‘हट जा ताऊ’ वादात! १६ जणांना बजावले नोटीस!

िग बॉस11’ची एक्स कंटेस्टंट आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. होय, हरियाणाचा लोकप्रीय गायक विकास कुमारने सपना चौधरी व ‘वीरे की वेडिंग’ या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकासह १६ लोकांना कॉपीराईट प्रकरणी ७ कोटी रूपयांचे कायदेशीर नोटीस बजावले आहे. हे प्रकरण  ‘वीरे की वेडिंग’मधील ‘हट जा ताऊ’ या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्याशी संबंधित आहे.  ‘हट जा ताऊ’ हे गाणे आपण १० वर्षांपूर्वी गायले होते. या गाण्याचे कॉपीराईट्सही आपल्याकडे आहेत. असे असताना  हे गाणे आपल्या परवानगीशिवाय ‘वीरे की वेडिंग’मध्ये सामील करण्यात आले. शिवाय परवानगीविना रिलीज करण्यात आले, असा विकास कुमारचा दावा आहे. मी २००६ मध्ये हे गाणे गायले होते. यात हरियाणाची संस्कृती दर्शवली होती. पण आता ‘वीरे की वेडिंग’मधील या गाण्यात हरियाणाच्या संस्कृतीचे चुकीचे दर्शन घडविले गेले आहे. मी माझ्या वकीलाच्या माध्यमातून ‘वीरे की वेडिंग’चे दिग्दर्शक आशु त्रिखा, निर्माता रजत बख्शी, सुनिधी चौहान, जिम्मी शेरगिल, युविका चौधरी, सपना चौधरी यांना नोटीस बजावले आहे. सात दिवसांत माझ्या या नोटीसचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास १६ सदस्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे विकास कुमारने म्हटले आहे.
‘हट जा ताऊ’ हे गाणे सुनिधी चौहानने गायलेले आहे. या गाण्यावर हरियाणाची सेन्सेशन सपना चौधरी थिरकताना दिसतेय. जिम्मी शेरगिल, युविका चौधरी यांनी या चित्रपटात काम केले आहे.

ALSO READ : सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री! पाहा, ‘वीरे की वेडिंग’चे हे गाणे!!

‘वीरे की वेडिंग’ हा चित्रपट येत्या २ मार्चला रिलीज होतोय.  या  रोमॅन्टिक कॉमेडीपटातील ‘हट जा ताऊ’ हे सपना चौधरीवर चित्रीत गाणे  प्रचंड लोकप्रीय झाले आहे.   रिलीज झाले तेव्हापासून युट्यूबवर सुमारे ७२ लाखांवर लोकांनी ते पाहिले आहे.
 

Web Title: Saptana Chowdhury's 'Hat Ja Tau' debate! Notice to 16 people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.