सपना व्यास-पटेलने ३० किलो वजन केले कमी; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 17:07 IST2017-08-08T11:07:06+5:302017-08-08T17:07:13+5:30

लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यावरून चर्चेत असलेली गुजरातचे भाजपा नेते तथा माजी मंत्री जयनारायण व्यास यांची मुलगी सपना व्यास- पटेल ...

Sapna Vyas-Patel reduced weight by 30 kg; Read detailed! | सपना व्यास-पटेलने ३० किलो वजन केले कमी; वाचा सविस्तर!

सपना व्यास-पटेलने ३० किलो वजन केले कमी; वाचा सविस्तर!

करच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यावरून चर्चेत असलेली गुजरातचे भाजपा नेते तथा माजी मंत्री जयनारायण व्यास यांची मुलगी सपना व्यास- पटेल सध्या इंटरनेटवर धूम उडवित आहे. सपनाचे हॉट आणि सेक्सी फोटो नेटिझन्सना वेड लावत असून, तिचा प्रत्येक फोटो वाºयासारखा व्हायरल होत आहे. मात्र सपनाचे हे सौंदर्य आणि फिट फिगर एवढ्या सहजासहजी मिळाले नाही. कारण त्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. जेव्हा सपना १९ वर्षांची होती, तेव्हा तिचे वजन ८० किलो इतके होते. मात्र सपनाने कुठल्याही प्रकारचे औषध अथवा सर्जरी न करता तब्बल ३० किलो वजन कमी करीत सेक्सी फिगर मिळविला आहे. 




सध्या सपना इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस आहे. फिटनेस ट्रेनर म्हणून काम करीत असलेली सपना मॉडलिंगमध्ये फर्स्ट च्वॉईस आहे. सपनाचे इन्स्टावरील फोटो बघून अनेकांची बोलती बंद होत असल्याने, तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात रंगविल्या जात आहेत. सपनाचे इन्स्टाग्रामवर १४ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर यू-ट्यूबवर आतापर्यंत तिला ९ लाखांपेक्षा अधिक लोकांना सब्सक्राइब केले आहे. खरं तर सपनाचे रूप प्रेमात पाडणारे असल्यानेच तिच्या फॅन्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 





सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ रोजी अहमदाबाद येथे झाला. २७ वर्षीय सपना विवाहित असून, तिने नेहमीच तिच्या पतीला लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. त्यामुळेच ती विवाहित असल्याची बाब बहुतांश लोकांना माहिती नाही. जेव्हा ती १९ वर्षाची होती, तेव्हा तिला वजनवरून चिडविले जात होते. पुढे तिने सुडौल फिगर बनविण्यासाठी फिटनेस ट्रेनर होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनंतर तिने तब्बल ३० किलो वजन कमी केले. सपनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, १९ वर्षाची असताना मी माझ्या तीन वर्षाच्या पुतणीसोबत खेळत होते. तेव्हा मला एका व्यक्तीने म्हटले की, तुझी मुलगी खूपच क्यूट आहे. हीच बाब मला अस्वस्थ करून गेली. 





कधीकाळी सपनाचे वेस्ट ३६ इंच होते, परंतु सपनाने प्रचंड मेहनत घेत आपले वजन ५० किलोवर आणले. आता सपनाच्या कंबरची साइज २४ इंच एवढी आहे. सपनाच्या मते, दिवसातील दोन तास आणि प्रॉपर डाइट आणि वर्कआउट प्लॅन केल्यास सुडौल आणि फिट फिगर मिळविता येतो. सपनाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फिट बॉडी आणि हेल्थसाठी अवेयर करायचे आहे. त्यासाठी ती लोकांना टीप्सही देत असते. अर्थातच यासाठी तिने उच्च शिक्षण घेतले आहे. 





सपनाने सुरुवातीचे शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर कॉलेज येथून पूर्ण केले. तिने सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटी येथून एमबीए केले. २०१० मध्ये सपनाने रिबॉक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनिंग कोर्स ज्वाइन केला. पुढे तिने अहमदाबादच्या इंडियन मॅनेजमेंट अकॅडमी येथून लाइफस्टाइल ब्रॅण्ड मॅनेजमेंट या विषयात पीएचडी केली. सपना सध्या एक सर्टिफाइट ट्रेनर आहे. तिने इन्स्टाग्रामसह फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंग साइटवर धूम उडवून दिली आहे. सपनाच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. 

Web Title: Sapna Vyas-Patel reduced weight by 30 kg; Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.