कानपूरमध्ये सपना चौधरीच्या ठुमक्यांनी गर्दी झाली अनियंत्रित! पोलिसांना करावा लागला लाठीमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 06:30 AM2018-02-12T06:30:44+5:302018-02-12T12:00:44+5:30

‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी सपना चौधरी सध्या जाम चर्चेत आहे. सपनाच्या एका कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गोंधळ घातला. यानंतर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.

Sapna Chowdhury's tomb in Kanpur rushed to the crowd! Lathila has been given to police! | कानपूरमध्ये सपना चौधरीच्या ठुमक्यांनी गर्दी झाली अनियंत्रित! पोलिसांना करावा लागला लाठीमार!

कानपूरमध्ये सपना चौधरीच्या ठुमक्यांनी गर्दी झाली अनियंत्रित! पोलिसांना करावा लागला लाठीमार!

googlenewsNext
िग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी सपना चौधरी सध्या जाम चर्चेत आहे. हरियाणाची लोकप्रीय डान्सर अशी ओळख असलेल्या सपनाचे आधीच लाखो चाहते होते. पण सलमानच्या शोमध्ये सपनाने पाऊल ठेवले आणि तिच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात गेली. बॉलिवूड आणि टीव्हीची कवाडे तिच्यासाठी खुली झालीत. ‘बिग बॉस11’मधून बाहेर येताच सपनाला एका टीव्ही वाहिनीवरील शोमध्ये आयटम साँग करण्याची संधी मिळाली. याशिवाय बॉलिवूडच्या अनेक आॅफर्सही तिला मिळाल्यात.



आत्ता सपनाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, सपनाच्या एका कार्यक्रमात लोकांनी  प्रचंड गोंधळ घातला. यानंतर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. कानपूरस्थित स्वरूप पार्कमध्ये सपनाचा लाईव्ह शो आयोजित केला गेला होता. या शोमध्ये सपनाने ‘आख्या का यो काजल’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स सुरू करताच समोर बसलेले लोक अनियंत्रित झालेत आणि त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. काही क्षणातच हा गोंधळ वाढतच गेला आणि पुढे आपआपला बचाव करण्यासाठी लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकणे सुरू केले. यात अनेकजण जखमी झाल्याचेही कळते. सपनाने स्वत: गर्दीलाशांत होण्याचे आवाहन केले. पण गर्दी कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.अखेर सपनाचा कार्यक्रम मध्येच रोखण्यात आला आणि सपना सुरक्षित मंचावरून खाली उतरवण्यात आले. अर्थात असे पहिल्यांदाच झाले नाही. याआधीही अनेकदा सपनाच्या शोमध्ये अफरातफर माजली आहे.

खूप लहान वयात सपनाने स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते.  सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते. 

ALSO READ : ​सपना चौधरीच्या आयुष्यात ही व्यक्ती आहे स्पेशल,जाणून घ्या काही Unknown Facts

Web Title: Sapna Chowdhury's tomb in Kanpur rushed to the crowd! Lathila has been given to police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.