सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीची उडाली होती घाबरगुंडी, या गोष्टीला घेवून मागितली होती माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:45 AM2020-08-22T11:45:00+5:302020-08-22T11:56:40+5:30

रिया चक्रवर्तीसोबत दहा लोक सीबीआय चौकशीच्या रडारवर आहेत.

सॉरी बाबु...सुशांतचा मृतदेह पाहून ढसाढसा रडली रिया चक्रवर्ती, या गोष्टीला घेवून माफीही मागितली | सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीची उडाली होती घाबरगुंडी, या गोष्टीला घेवून मागितली होती माफी

सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीची उडाली होती घाबरगुंडी, या गोष्टीला घेवून मागितली होती माफी

googlenewsNext

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत रोज नवीन नवीन खुलासे होताना दिसतायेत.    आरोप प्रत्यारोपांसोबत आणि खुलासे पटनामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार झाल्यानंतर समोर येऊ लागले आहेत.सुशांतचा मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अश्रु अनावर झाले होते आणि तिने सुशांतची माफी मागितली होती अशी नवीन माहिती समोर आली आहे. कपूर रुग्णालयातील कर्मचारी सुरजीत सिं ह राठोड याने ही माहिती दिल्याचं ‘एबीपी न्युज’च्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच  रियाला ताब्यात घेतलं जाऊ शकते. व्यावसायिक वैर देखील तपासले जाईल.माहिती समोर आली आहे. 


८ जून रोजी सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला होता की, 'आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलणं झाल्यावर माझे डोळे उघडले गेले. तुम्ही माझे एंजल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि आजही आहात'. एका दुसऱ्या मेसेजमध्ये रियाने लिहिले की, 'तुम्ही मला पुन्हा आझाद केलंय, तुम्ही माझ्या आयुष्यात देवासारखे आहात. तेच महेश भट्ट यांनी उत्तर दिलं की, आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडिलांना माझ्याकडून प्रेम दे. आता ते फार आनंदी होतील'.

रिया चक्रवर्तीसोबत दहा लोक सीबीआय चौकशीच्या रडारवर आहेत. यात रिया चक्रवर्ती शिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज, त्याची आधीची मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाची आई संध्या चक्रवर्ती यांचा समावेश आहे. या लोकांपैकी सिद्धार्थ पिठानी मुंबई सोडून हैदराबादमध्ये राहत आहे. बाकीचे सर्व मुंबईतच आहेत.

Web Title: सॉरी बाबु...सुशांतचा मृतदेह पाहून ढसाढसा रडली रिया चक्रवर्ती, या गोष्टीला घेवून माफीही मागितली

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.