'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:57 PM2024-04-23T12:57:18+5:302024-04-23T12:58:42+5:30

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलसोबत एक खास व्हिडीओ संतोष जुवेकरने शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिलीय (santosh juvekar, vicky kaushal, chava)

Santosh Juvekar's fun with Vicky Kaushal on the sets of Chava video viral | 'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.."

'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.."

अभिनेता संतोष जुवेकर सध्या अभिनेता विकी कौशलसोबत 'छावा' सिनेमाचं शूटींग करत होता. संतोषने त्याचं 'छावा' सिनेमाचं शुटींग संपवलं आहे. यानिमित्ताने त्याने सेटवरचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओत संतोष विकीसोबत मजा-मस्ती करताना दिसतोय. व्हिडीओ शेअर करुन संतोष लिहितो, "Finally माझं shoot संपल. पण शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल तर काम बहारदार रंगत आणि मनही कामात रमतं." 

संतोष पुढे लिहितो, "हया clip मधून तुम्हला आम्ही set वर केलेल्या मस्तीची कल्पना येईल पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला trailer येईल तेंव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याचिसुद्धा कल्पना येईल. आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेंव्हा नवीन माणसांची नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत."


संतोष पुढे लिहितो,  "लक्ष्मण उतेकर सर तुम्हाला आणि आपल्या direction टीमला आपल्या संपूर्ण @maddockfilms production टीमला, आपले DOP सौरभ sir, बबलू sir, fight director परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाऊपिऊ घालणे डिपार्टमेंट वाले आणि सगळेच तुम्हां सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी  कोशल पाजी , आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी sir, pradeep sir, तुम्हां सगळ्यांना big love u. आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा , छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशिर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत..... जय भवानी."

Web Title: Santosh Juvekar's fun with Vicky Kaushal on the sets of Chava video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.