बाबाने शेअर केलेत लेकीचे हे सुंदर फोटो! बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही या स्टारची मुलगी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:37 PM2020-04-27T13:37:52+5:302020-04-27T13:38:49+5:30

पाहणा-याची हटणार नाही नजर...

sanjay kapoor daughter shanaya glamours photos-ram | बाबाने शेअर केलेत लेकीचे हे सुंदर फोटो! बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही या स्टारची मुलगी!!

बाबाने शेअर केलेत लेकीचे हे सुंदर फोटो! बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही या स्टारची मुलगी!!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यंतरी करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी चर्चा होती.

‘हम भी कुछ कम नहीं’ असे जगाला दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. अभिनेता संजय कपूर याची लाडकी लेक म्हणजे शनाया कपूर यापैकीच एक. सोनम कपूरच्या लग्नातील शनाया भलतीच भाव खाऊन गेली आणि ती अचानक चर्चेत आली. शनाया बॉलिवूडमध्ये येणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण तूर्तास तरी ती याबद्दल काहीही बोललेली नाही.  बॉलिवूड पदार्पणाबद्दल काहीही न बोलणारी ही शनाया सोशल मीडियावर मात्र कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. शनाया स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता तिच्या बाबाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इतकी सुंदर दिसतेय की पाहणा-याची नजर हटणार नाही.

आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलीवूडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.बाबांनी शेअर केलेल्या या फोटोतही शनायाचा अंदाज सगळ्यांना वेड लावणारा आहे.

ताज्या फोटोतील शनायाचा अंदाज, तिच्या चेह-यावरचा आत्मविश्वास बघता ती भविष्यात चांगली अभिनेत्री बनणार, हे नक्की.

अद्याप शनाया कोणत्याही सिनेमात झळकली नाही तरीही तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फोलोविंग आहे. 


 
मध्यंतरी करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी चर्चा होती. अलीकडे शनाया करणच्या आॅफिसबाहेर दिसल्यानंतर शनायाचा डेब्यू पक्का मानला गेला होता. पण तूर्तास तरी शनाया  अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून  काम करतेय.

 


 
शनायाला अभिनेत्री बनायचे आहे. पण त्यापूर्वी अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतील सर्व बारकावे शिकण्याकडे तिचा कल आहे. याचमुळे हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याचा अनुभव तिला घ्यायचा आहे.

 

 

Web Title: sanjay kapoor daughter shanaya glamours photos-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.