'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:52 PM2022-07-25T13:52:56+5:302022-07-25T13:53:25+5:30

Sanjay Dutt: 'शेवटी तू का मरतोस?' असा प्रश्न अभिनेता संजय दत्तला त्याच्या मुलांनी 'शमशेरा' चित्रपट पाहिल्यानंतर विचारला होता.

Sanjay Dutt was shocked to hear the question of the children, 'Why do you die in the end?', he said.. | 'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...

'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)ने कधी रोमँटिक हिरो तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच अभिनेता संजय दत्तचाशमशेरा (Shamshera) चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याने खलनायक शुद्ध सिंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात संजय दत्त शिवाय रणबीर कपूर आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्त हल्ली जास्त निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसतो. बऱ्याचदा चित्रपटात खलनायकाचा मृत्यू होतो असे दाखवले जाते. संजय दत्तचे चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या मुलांनी हैराण करणारा प्रश्न त्याला विचारला आहे. 

'माझी मुलं मला विचारतात शेवटी तू का मरतोस?' असा प्रश्न अभिनेता संजय दत्तला त्याच्या मुलांनी 'शमशेरा' चित्रपट पाहिल्यानंतर विचारला होता. संजयने मुलांना कसे समजावले? त्यावर अभिनेता म्हणाला की, मी मेलेला नाही. तो नुकताच बेशुद्ध पडला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मी पुन्हा येणार आहे. माझ्या उत्तराने मुले खूश झाली. मुलं अजून लहान आहेत, मोठी झाल्यावर त्यांना समजेल. सतत धोकादायक व्यक्तिरेखा साकारण्याच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला, 'दरम्यान मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाने मला सांगितले की प्रेक्षकांना तुम्हाला फक्त खतरनाक भूमिकांमध्येच पाहायचे आहे. तेच कर.

'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंदीगडला आलेल्या संजय दत्तला विचारण्यात आले की, अभिनेता रणबीर कपूर तुझा मोठा चाहता आहे, तरीही चित्रपटात हंटरने मारहाण केली त्यावेळी तुला त्याची दया आली नाही का, उत्तरात तो म्हणाला की, जेव्हा-जेव्हा मी रणबीर कपूरला विचारले की मला ते आवडले नाही. मी हे चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​यांनाही सांगितले होते, पण आम्ही व्यावसायिक लोक आहोत, आम्हाला जे पात्र मिळेल तेच आम्ही साकारतो.

Web Title: Sanjay Dutt was shocked to hear the question of the children, 'Why do you die in the end?', he said..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.