कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स

By गीतांजली | Updated: December 10, 2020 11:47 IST2020-12-10T11:21:14+5:302020-12-10T11:47:01+5:30

कॅन्सरवर मात देऊन संजय दत्तने आगामी 'केजीएफ: चॅप्टर २'सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे

Sanjay dutt starts shooting of climax of kgf chapter 2 with yash | कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स

कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सर झाल्यामुळे चर्चेत होता. आता अशी बातमी येत आहे की, कॅन्सरवर मात देऊन संजय दत्तने आगामी 'केजीएफ: चॅप्टर २'सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. संजय सध्या हैदराबादमध्ये सिनेमाचा हिरो यशसोबत एका मोठा क्लायमॅक्सच्या सीनचे शूटिंग करतो आहे. या सीनमध्ये अनेक स्टंट आणि फाइट सीन्स असतील. या सीनसोबतच सिनेमाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. 

केजीएफ २मध्ये दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा आहे. हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची अनेक पोस्टर्स समोर आली आहेत. ज्यात अभिनेता यश आणि संजय दत्त तसेच अभिनेत्री रवीना टंडन यांचा लूक समोर आला आहे. 'केजीएफ: चॅप्टर २'मध्ये संजय दत्त व्हिलनची भूमिका साकारणार असून त्याच्या भूमिकेचे नाव अधीरा आहे. 


केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाबद्दल बोललो तर त्यात संजय दत्त, रवीना टंडन, यश यांच्यासारखे मुख्य कलाकार मुख्य भूमिकेत असतील.यशचा चित्रपट 'केजीएफ चॅप्टर २' हा २०२१ चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.


 

Web Title: Sanjay dutt starts shooting of climax of kgf chapter 2 with yash