संजय दत्तने आमिर खानला ‘या’ चित्रपटात केले रिप्लेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 19:24 IST2017-07-04T13:54:14+5:302017-07-04T19:24:14+5:30

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करणे प्रत्येक निर्मात्याचे स्वप्न आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. परंतु आमिर ...

Sanjay Dutt returns to Aamir Khan's 'Revenge'! | संजय दत्तने आमिर खानला ‘या’ चित्रपटात केले रिप्लेस!

संजय दत्तने आमिर खानला ‘या’ चित्रपटात केले रिप्लेस!

स्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करणे प्रत्येक निर्मात्याचे स्वप्न आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. परंतु आमिर एका वर्षात एकच चित्रपट करीत असल्याने, बरेचसे निर्माते त्याची डेट मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. असाच काहीसा प्रसंग निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत घडल्याने आमिरच्या जागी त्यांना अभिनेता संजय दत्त याचा विचा करावा लागला. आता सिद्धार्थ रॉय कपूरच्या आगामी चित्रपटात आमिरऐवजी संजूबाबा बघावयास मिळणार आहे. 

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सक्सेसफुल ट्रेंड सुरू आहे. प्रत्येक निर्माता बायोपिक निर्मिती करण्याचा विचार करीत असून, या यादीत आता सिद्धार्थ रॉय कपूर यांचेही नाव जोडले आहे. सिद्धार्थ भारताचे पहिले अ‍ॅस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करीत आहेत. ‘सारे जहॉँ से अच्छा’ असे या बायोपिकचे नावही निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी आमिर खान याच्याशी चर्चा सुरू होती. मात्र आमिरबरोबरची चर्चा फिसकटल्याने आता संजूबाबा राकेश शर्मा यांची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. 

वास्तविक आमिरचाच या चित्रपटाला नकार होता. त्याला हा चित्रपट करायचा नव्हता, त्यामुळे त्याने सुरुवातीलाच यास नकार दिला. सध्या आमिर त्याच्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात आमिर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. संजूबाबाविषयी सांगायचे झाल्यास, नुकतेच त्याने त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. सध्या त्याच्या आयुष्यावर ‘दत्त’ नावाच्या बायोपिकची निर्मिती केली जात आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाला पडद्यावर साकारणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर याने प्रचंड मेहनत घेतली असून, संजूबाबासारखे दिसण्यासाठी त्याने वजन वाढविले आहे. 

काही दिवसांपूर्वीच संजूबाबा त्याच्या परिवारासह विदेशात सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. पत्नी मान्यता हिने सुट्या एन्जॉय करतानाचे बरेचसे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आता तो भारतात परतला असून, लवकरच ‘सारे जहॉँ से अच्छा’ या प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची शक्यता आहे. 

Web Title: Sanjay Dutt returns to Aamir Khan's 'Revenge'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.