अभिनेत्याची नवी इनिंग! मुंबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:26 IST2025-09-22T10:25:44+5:302025-09-22T10:26:48+5:30

असे अनेक कलाकार आहेत, जे फक्त चित्रपट क्षेत्रातच नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावत आहेत.

Sanjay Dutt Launched Restaurant Solaire Located At The Grand Hyatt Mumbai In Bkc | अभिनेत्याची नवी इनिंग! मुंबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

अभिनेत्याची नवी इनिंग! मुंबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे फक्त चित्रपट क्षेत्रातच नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावत असतात. इंडस्ट्रीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्यानं मुंबईत नवं  स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.  हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून संजय दत्त (Rutuja Bagwe) आहे. संजय दत्तने नुकतेच स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 

संजय दत्तचं रेस्टॉरंट कालपासून खाद्यप्रेमीसाठी सुरू झालं आहे.  या निमित्ताने एक  लाँच पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत संजय त्याच्या पत्नीसोबत स्टायलिश लूकमध्ये पोहोचला होता. संजय दत्तच्या रेस्टॉरंटचं नाव "सोलेअर" असं आहे. सोशल मीडियावर त्याचे रेस्टॉरंटचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे  रेस्टॉरंट मुंबईतील बीकेसी येथील ग्रँड हयात येथे आहे.संजय दत्तच्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.


दरम्यान, काही दिवसांपुर्वीचं संजय दत्तनं एक नवीन रेस्टॉरंट दुबईत सुरु केलं होतं.  त्याच्या या रेस्टॉरंटचं नाव 'दत्त्स फ्रँकटी' (Dutts’franktea) असं आहे. कामाच्या बाबतीत, संजय दत्त अलीकडेच "बागी ४" चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ, हरनाज कौर संधू आणि सोनम बाजवा यांनी भूमिका केल्या होत्या. संजय दत्तचा या वर्षी अनेक प्रमुख चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यात संजय दत्तची मुख्य भूमिका असलेला "धुरंधर" देखील आहे.


Web Title: Sanjay Dutt Launched Restaurant Solaire Located At The Grand Hyatt Mumbai In Bkc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.