वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:32 PM2022-03-23T17:32:55+5:302022-03-23T17:33:36+5:30

Sanjay dutt: वयाची ६० वर्ष पार केल्यानंतरही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे.

sanjay dutt heavy weight lifting in 62 age flaunts huge biceps photo viral | वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

googlenewsNext

संजय दत्त (sanjay dutta) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. संजू बाबा या नावाने प्रसिद्धी मिळवलेल्या संजयच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यामुळे त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्य कायम चाहत्यांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरले. आयुष्यात अनेक टप्पे पार केल्यानंतर संजय पुन्हा एकदा कालाविश्वाकडे वळला आहे.  गेल्या काही काळात त्याचा सोशल मीडियावरील वावरही वाढला आहे. यात अलिकडेच त्याने इन्स्टावर हेवी वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

 कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेला संजय दत्त अनेकदा त्याच्या कुटुंबासोबतचे किंवा वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.  यामध्ये सध्या त्याने हेवी वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे वयाची ६० वर्ष पार केल्यानंतरही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे.


 
संजयने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हेवी वेट लिफ्टिंग करत आहे. हे वेट लिफ्टिंग करत असताना त्याचं बायसेप्स दिसत असून त्याच्यावर काढलेलं टॅटूही कमालीचं सुंदर दिसत आहे. त्यामुळे सध्या संजयच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

"मृत्यूच्या वाटेवर मला फक्त देवाची भीती वाटते. त्याच जागी पुन्हा येऊन आनंदी आहे. माझं घर, माझी जीम. कधी हार मानू नका, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.  संजय लवकरच 'केजीएफ चॅप्टर 2' मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार यश स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच या चित्रपटाव्यतिरिक्त संजय 'पृथ्वीराज', 'शमशेरा' आणि 'घुडचढ़ी' या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.
 

Web Title: sanjay dutt heavy weight lifting in 62 age flaunts huge biceps photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.