भूमीच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:07 IST2017-03-21T12:37:58+5:302017-03-21T18:07:58+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा भूमी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. अ‍ॅक्शनदृष्यादरम्यान त्याच्या छातीला मार बसला. संजय दत्तची जेलमधून सुटका ...

Sanjay Dutt gets injured during shooting | भूमीच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

भूमीच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

लिवूड अभिनेता संजय दत्त हा भूमी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. अ‍ॅक्शनदृष्यादरम्यान त्याच्या छातीला मार बसला.
संजय दत्तची जेलमधून सुटका झाल्यानंतरचा हा चित्रपट आहे. जखमी झाल्यानंतरही संजय दत्तने शूटिंग सुरूच ठेवले. त्यानंतर त्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यात  फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. 
मिड डे ने दिलेल्या बातमीनुसार या चित्रपटाचे शूटिंग चंबळ येथे सुरू आहे. अ‍ॅक्शन सीनदरम्यान काही गुंड संजय दत्तवर हल्ला करतात. याच दरम्यान संजयला छातीत त्रास होऊ लागला. पेन किलर औषध घेऊन संजयने पुन्हा शूटिंगला सुरूवात केली. त्यानंतरही संजयचा त्रास कमी झाला नाही. त्रास कमी होत नसल्याने त्याने रुग्णालयात जाऊन एक्स रे काढला. यात त्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.
सध्या संजय दत्त औषध घेत असून, डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. संजय दत्त या महिनाअखेर शूटिंग पूर्ण करण्याच्या बेतात होता. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना झालेला हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी खांबाला धडकून संजय दत्त जखमी झाला होता. 
या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार हे करीत असून, भूषण कुमार हे निर्माते आहेत.

Web Title: Sanjay Dutt gets injured during shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.