संजय दत्त पुन्हा झाला भावूक ! म्हणे,तुरुंगात मी माशी पडलेली डाळही खाल्ली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 12:58 IST2017-07-23T05:03:06+5:302017-07-23T12:58:18+5:30

संजय दत्तबाबत आपण खूप काही जाणतो. बॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता असूनही त्याचे आयुष्य कुठल्या आख्यायिकेपेक्षा कमी नाही. कदाचित म्हणून दिग्दर्शिक ...

Sanjay Dutt gets emotional again! I said, in the prison, I ate the pulse lying! | संजय दत्त पुन्हा झाला भावूक ! म्हणे,तुरुंगात मी माशी पडलेली डाळही खाल्ली!!

संजय दत्त पुन्हा झाला भावूक ! म्हणे,तुरुंगात मी माशी पडलेली डाळही खाल्ली!!

जय दत्तबाबत आपण खूप काही जाणतो. बॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता असूनही त्याचे आयुष्य कुठल्या आख्यायिकेपेक्षा कमी नाही. कदाचित म्हणून दिग्दर्शिक राजकुमार हिराणींना त्याच्या आयुष्यावर सिनेमा आणावासा वाटला. संजयने आयुष्यात बरेच काही अनुभवले. पण त्याच्या चेह-यावरची हास्याची लकीर जराही विरली नाही. 
संजयच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याच्यावरील बायोपिकच्या निमित्ताने आपल्यासमोर येत आहेत. पण या बायोपिकच्या आधी संजयने स्वत:च्या आयुष्याबदद्लच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यातील काही गोष्टी त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल आहेत. तुरुंगात मी माशी पडलेले वरणही खाल्ले, हे संजयचे शब्द.
अलीकडे एका मुलाखतीत त्याने याबद्दलचा एक किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, तुरुंगात दोन महिन्यांचा काळ असा असतो की, त्याकाळात तिथे प्रचंड माशा असतात. आता असे असताना आपण काय करू शकतो. त्या माशा तुमच्या जेवणात, तुमच्या शरिरावर  प्रत्येकठिकाणी असतात. माशी जेवणात पडली की, तिला फेकून द्यायचो आणि पुढे आलेले खायचो. तिथे माझा एक मित्र होता, युसूफ. तो असे जेवण खायचाच नाही. एकदिवस आम्ही एकत्र  जेवायला बसलो होतो. मी त्याला म्हटले का खात नाहीत. खा. यावर वरणात माशी पडल्याचे त्याने मला सांगितले. मी माशी घेतली अन् काढून फेकली. म्हटलं, आता खा. तर दोन- तीन माशा तू आधीच खावून चुकला आहेस, असे तो मला म्हणाला. मी त्याला म्हटले, तू पण खा मित्रा, तसेही येथे प्रोटीन कमी मिळते.
संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. पुढीलवर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: Sanjay Dutt gets emotional again! I said, in the prison, I ate the pulse lying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.