'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:33 IST2021-11-15T16:31:57+5:302021-11-15T16:33:22+5:30
Trishala dutt: सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या त्रिशालाने अलिकडेच 'आस्क मी एनिथिंग'मध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच काही पर्सनल लाइफविषयीदेखील प्रश्न विचारले.

'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची (sanjay dutt) लेक त्रिशाला दत्त (trishala dutt) भलेही कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर तिची कायमच चर्चा रंगत असते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या त्रिशालाने अलिकडेच 'आस्क मी एनिथिंग'मध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच काही पर्सनल लाइफविषयीदेखील प्रश्न विचारले. यात तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं तिने हटके उत्तर देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
त्रिशालाच्या एका चाहत्याने तिला लग्नाविषयी प्रश्न विचारला. तुझा वेडिंग प्लॅन काय आहे? असा प्रश्न त्रिशाला हिला विचारण्यात आला. त्यावर तिने चाहत्यांना हटके उत्तर दिलं.
"हा खरंच फार कठीण प्रश्न आहे. पण या वयात डेटिंग करणं खरंच फार अवघड असतं. असा एक तरी जण असतोच जो कायम विचार करतो की एक ना एक दिवस आपण आणखी काही तरी चांगलं करुन दाखवू. मला अशाच एखाद्या व्यक्तीचा शोध आहे. जो जेंटलमॅन असेल. जो मला माझ्या वाट्याचा सन्मान, प्रेम आणि आपुलकीने वागेल त्या व्यक्तीशी मी लग्न करेन. आणि, मी देखील तसंच वागेन. हॅप्पी वाइफ, हॅप्पी लाइफ", असं त्रिशाला म्हणाली.
दरम्यान, त्रिशालाच्या प्रियकराचं २०१९ मध्ये निधन झालं. त्याच्या निधनाचा त्रिशालाला प्रचंड मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून त्रिशाला आता हळूहळू सावरत आहेत.