संजय दत्तने पूर्ण केले आगामी चित्रपटाचे पहिले शे़ड्यूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:17 IST2017-10-13T08:47:40+5:302017-10-13T14:17:40+5:30

संजय दत्तचा नुकताच भूमी या चित्रपटात दिसला पण त्याचा हा चित्रपट फारसा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नव्हता. या चित्रपटाने बॉक्स ...

Sanjay Dutt completes his first schedule of upcoming film | संजय दत्तने पूर्ण केले आगामी चित्रपटाचे पहिले शे़ड्यूल

संजय दत्तने पूर्ण केले आगामी चित्रपटाचे पहिले शे़ड्यूल

जय दत्तचा नुकताच भूमी या चित्रपटात दिसला पण त्याचा हा चित्रपट फारसा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नव्हता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ही फारसे कलेक्शन जमवता आले नव्हते. मात्र हे सगळे विसरुन संजय दत्त नव्या चित्रपटाच्या शूटिंगला लागला आहे. संजय दत्तने त्याच्या आगामी चित्रपटाच्या म्हणजेच 'साहेब बिवी और गँगस्टर ३' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग राजस्थान मधल्या बिकानेर इथे सुरु आहे. 
या चित्रपटाचा दिग्दर्शक तिग्मांशू धुलियाने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे ह्याचा खुलासा केला त्याने असे लिहिले 'आम्ही साहेब बिवी और गँगस्टर ३'च्या पहिल्या टप्प्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. मी संजय दत्तबरोबर पहिल्यांदाच काम करत आहे. तो एक छान व्यक्तिमत्त्व आहे"

२०११ मध्ये साहेब बिवी और गँगस्टरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये जिमी शेरगिल, माही गिल आणि रणदीप  हुंडा ह्यांनी काम केले होता. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या एका शाही परिवाराच्या संबंधित आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न २०१३ मध्ये तयार करण्यात आला आहे. आता साहेब बिवी और गँगस्टर ३ बनवला जात असून त्यात अनुभवी अभिनेत्री नफिसा अली संजय दत्तच्या आईची भूमिका साकारताना दिसेल तर अभिनेता कबीर बेदी चित्रपटात संजय दत्तच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. यात संजय दत्त एक गँगस्टरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. वास्तवमध्ये एका गँगस्टरची भूमिका संजय दत्तने साकारली होती आणि ती प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली होती. वास्तवनंतर पुन्हा एक गँगस्टर मोठ्या पडद्यावर साकारायला संजूबाबा तयार झाला आहे.

ALSO RAED : संजूबाबाच्या बायोपिकने वाढवली मान्यता दत्तची चिंता? रणबीर कपूरचा वाढला वैताग?

राजकुमार हिराणी संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित दत्त चित्रपट तयार करतो आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे.  रणबीर कपूरसह दीया मिर्झा, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे शूटींग ब-याच दिवसांपासून सुरु आहे. 

Web Title: Sanjay Dutt completes his first schedule of upcoming film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.