SANJAY DUTT BIOPIC: दिसला रे दिसला...रणबीर कपूर संजय दत्तसारखा दिसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 13:31 IST2017-02-12T07:59:24+5:302017-02-12T13:31:16+5:30
अखेर चाहत्यांच्या मनात जी शंका होती तिचे निरासन झाले आहे. रणबीर कपूर संजय दत्तसारखा कसा दिसू शकतो असा प्रश्न ...

SANJAY DUTT BIOPIC: दिसला रे दिसला...रणबीर कपूर संजय दत्तसारखा दिसला!
अ ेर चाहत्यांच्या मनात जी शंका होती तिचे निरासन झाले आहे. रणबीर कपूर संजय दत्तसारखा कसा दिसू शकतो असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी जर त्याचे लेटेस्ट फोटो पाहिले तर आश्चर्याने तोंडात बोट घालण्यावाचून त्यांच्याकडे पर्यायच राहणार नाही. विश्वास बसत नाही ना?
अहो, रणबीरने ‘संजय दत्त लूक’ पकडण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच त्याला संजय दत्तच्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आले. तेव्हा त्याचे वाढलेले वजन आणि प्रसिद्ध ‘संजूबाब चालण्याची स्टाईल’ पाहून उपस्थित फोटोग्राफर्सनाही काही क्षणांकरिता तो संंजय दत्तच वाटला.
तुम्ही प्रथम हे फोटो पाहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही काय सांगतोय...
![Ranbir and Anurag]()
![Ranbir and Anurag]()
दिग्दर्शक अनुराग बसूसोबत संजयच्या घरातून बाहरे पडताना रणबीर दिसतोय. यावेळी त्याने पांढरा रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, निळी जिन्सी आणि लाल कॅप घातलेली होती. त्याला समोरच्या बाजूस थोडे वाकून चालताना पाहून त्याने संजय दत्तची पर्सनालिटी पूर्णपणे अंगीकारली आहे याचे प्रत्यक्ष दर्शन घडविले.
राजकुमार हिराणींनी काही वर्षांपूर्वी संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्याची भूमिका कोण करणार याविषयी अंदाज वर्तवले जाऊ लागले. मात्र, सगळ्यांचे तर्क खोटे ठरवत निर्मात्यांनी रणबीरच्या नावाची घोषणा केली आणि सर्वच लोक हैराण झाले.
►ALSO READ: संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरने वाढवले 13 किलो वजन साठी
रणबीर संजय दत्त बनूच शकत नाही, संजयची देहबोली तो अंगीकारूच शकत नाही, अशा आशयाची चर्चा सुरू झाली. गेल्या महिन्यात या बायोपिकची शूटींगही सुरू झाली. तरीदेखील रणबीरच्या निवडीबाबत अनेक जण साशंकित होते. अखेर हे फोटो पाहून त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर मिळेल.
![Ranbir and Anurag]()
![Ranbir and Anurag]()
रणबीर सध्या संजयचे सर्व चित्रपट, मुलाखती, फॅमिली व्हिडिओज् असे सगळे २५० तासांपेक्षा जास्त लांबीचे व्हिडिओ पाहत आहे. त्याच्या व्यक्तित्वातील एकूण एक छोटी-मोठी गोष्टी समजून घेण्यासाठी रणबीरचा आटापिटा सुरू आहे. राणा दुग्गुबतीचा फिटनेस प्रशिक्षक कुणाल गिर त्याला ट्रेनिंग देत आहे.
कुणालने सांगितले की, ‘रणबीरने रोज दीड तास न चुकता व्यायाम करणे सुरू केले असून मासांहारसुद्धा कमी केला आहे. आता तोआठवडाभर शाकाहार घेतो आणि शनिवारी त्याच्या आजीने बनवेले मांसाहारी जेवण करतो. सध्या आम्ही त्याचे वजन वाढविण्यावर काम करीत असून तो प्रचंड मेहनत घेत आहे.’
► ALSO READ: या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष