​संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या रंगू लागल्या मैफली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 11:52 IST2017-02-23T06:22:37+5:302017-02-23T11:52:37+5:30

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर अगदी गढून गेला आहे. अलीकडे या बायोपिकच्या सेटवरचे रणबीरचे काही फोटो लीक झालेत. त्यात ...

Sanjay Dutt and Ranbir Kapoor's concert roles! | ​संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या रंगू लागल्या मैफली!!

​संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या रंगू लागल्या मैफली!!

जय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर अगदी गढून गेला आहे. अलीकडे या बायोपिकच्या सेटवरचे रणबीरचे काही फोटो लीक झालेत. त्यात रणबीर कपूर अगदी हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय. पण शूटींग सुरु होण्याआधी मात्र रणबीर स्वत:च्या या भूमिकेबद्दल साशंक होता. आपण या भूमिकेला न्याय देऊ शकू की नाही, कदाचित याबद्दल रणबीरच्या मनात धाकधूक होती. आता तुम्ही म्हणाल असे कसे? तर गत डिसेंबरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द संजय दत्त जे बोलला होता, त्यावरून तरी हेच वाटते. माझी लाईफ इंटरेस्टिंग असावी, कदाचित म्हणून हिराणींना माझ्यावर बायोपिक बनवायला घेतले. रणबीर माझी भूमिका साकारतो आहे. पण त्याची स्थिती फारशी चांगली नाही. तो रोज मला फोन करतो. त्याला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. पण मी अर्ध्या तासापेक्षा फार वेळ कुणासोबत राहू शकत नाही. मी अक्षरश: त्याला टाळतो आहे. त्याच्यासाठी माझी भूमिका साकारणे जरा कठीणच होणार आहे, असे संजय दत्त या मुलाखतीत बेधडकपणे बोलून गेला होता. पण कदाचित आताश: संजय दत्तला रणबीरसोबत वेळ घालवणे आवडू लागले आहे. अर्धा तास नाही तर तासन् तास तो रणबीरसोबत असतो. दोघेही रात्रभर एकत्र बसून ड्रिंक एन्जॉय करत असतात.

ALSO READ : रणबीर कपूरच्या टोपीखाली दडलयं काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटींग संपते ना संपते तोच रणबीर व संजय दत्त एकत्र बसतात. यानंतर पहाटेपर्यंत एकीकडे ड्रिंक अन् दुसरीकडे चित्रपट आणि आयुष्याबद्दलच्या त्यांच्या गप्पा रंगतात. रणबीर कपूर अगदी हुबेहुब संजय दत्त दिसू लागला आहे. त्याची बॉडी लँग्वेज अगदी हुबेहुब संजयसारखी होत आहे, यासाठी या गप्पा तर कारणीभूत नसाव्यात ना? अगदी तसेच आहे.



एका माहितीनुसार, संजयने त्याचे २०० तासांचे रेकाँर्डिंग रणबीरला दिले आहे. आता इतक्या प्रयत्नानंतर रणबीर संजयच्या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल,

Web Title: Sanjay Dutt and Ranbir Kapoor's concert roles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.