आता म्हातारी झाल्यावर...; एअरपोर्टवर संगीता बिजलानीनं दिल्या पोझ, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:37 IST2021-12-06T18:35:35+5:302021-12-06T18:37:10+5:30
Sangeeta Bijlani : 80 च्या दशकात संगीता बिजलानीचा चांगलाच दबदबा होता. आजही अनेकजण तिच्या प्रेमात आहेत. सध्या याच ‘बिजली’चा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

आता म्हातारी झाल्यावर...; एअरपोर्टवर संगीता बिजलानीनं दिल्या पोझ, झाली ट्रोल
1980 साली तिनं मिस इंडियाचा किताब जिंकला. वयाच्या 16 व्या वर्षी तिनं मॉडेलिंग सुरु केलं. मॉडेलिंगच्या दिवसात तिच्या ग्लॅमरवर सगळेच फिदा होते. तिच्या ग्लॅमरमुळे मॉडेलिंग दुनियेत तिला ‘बिजली’ म्हणून ओळखलं जात होतं. आम्ही कुणाबद्दल बोलतोय तर संगीता बिजलानीबद्दल. आताश: संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani ) बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. पण 80 च्या दशकात तिचा चांगलाच दबदबा होता. आजही अनेकजण तिच्या प्रेमात आहेत. सध्या याच ‘बिजली’चा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून ही ‘61’ ची की ‘16’ची असा प्रश्न काही चाहत्यांना पडलायं तर काहींनी मात्र यावरून तिला ट्रोलही केलंय.
‘Voompla’ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. संगीताचा व्हिडीओ एअरपोर्टवरचा आहे. या व्हिडीओत ती फोटोग्राफर्सला जबरदस्त पोझ देत आहे. हॅट, शूटज, जॅकेट अश अवतारातील संगीताच्या या व्हिडीओवर नेटक-यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
हिने साठी ओलांडलीये, ही 61 वर्षांची आहे, शक्यचं नाही, अशी कमेंट एका युजरने केली आहे तर काहींनी हिची जन्मतारीख तपासा म्हणत, संगीताच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. काही ट्रोल करणारेही आहेत. या म्हातारीला काय झालंय, अशी कमेंट एकाने केली आहे. तरुण असताना केलं नाही. म्हणून आता म्हातारी झाल्यावर ही हौस पूर्ण करतेय,अशी खोचक कमेंट अन्य एकाने केली आहे.
संगीता बिजलानीने 988 साली कातिल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिला खरी ओळख दिली ती 1989 साली आलेल्या ‘हथियार’ या सिनेमाने. यानंतर त्रिदेव, जुर्म, योद्धा, खून का कर्ज अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली.
करिअरच्या काळात तिच्या व सलमान खानच्या अफेअरच्या चर्चा ब-याच गाजल्या होत्या. सलमान व संगीता लग्न करणार होते. असं म्हणतात की या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण अचानक हे नातं तुटलं. 1996 साली संगीताने क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केलं. 2010 साली दोघांचा घटस्फोट झाला.
1996 साली आलेल्या ‘निर्भय’ या सिनेमात संगीता अखेरची झळकली. यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. आता ती दिसते ती केवळ बॉलिवूडच्या इव्हेंटला आणि सलमानच्या घरच्या पार्ट्यांना.