​संन्यास वगैरे सगळे खोटे! मार्च 2018 मध्ये प्रियांका चोप्रा साईन करणार दोन बॉलिवूड सिनेमे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:44 IST2017-09-12T08:14:04+5:302017-09-12T13:44:04+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी आणि ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली ...

Saneasaha all the lies! Priyanka Chopra to do two Bollywood movies in March 2018 !! | ​संन्यास वगैरे सगळे खोटे! मार्च 2018 मध्ये प्रियांका चोप्रा साईन करणार दोन बॉलिवूड सिनेमे!!

​संन्यास वगैरे सगळे खोटे! मार्च 2018 मध्ये प्रियांका चोप्रा साईन करणार दोन बॉलिवूड सिनेमे!!

लिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी आणि ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. होय, प्रियांका बॉलिवूडमधून संन्यास घेऊ शकते, अशी बातमी मध्यंतरी आली होती. पण ही बातमी खोटी आहे. प्रियांकाच्या प्रवक्त्याने एक स्टेटमेंट जारी करून, या बातमीवर पूर्णविराम लावला आहे. प्रियांका बॉलिवूडच्या कुठल्या चित्रपटांत काम करणार, हे अद्याप ठरलेले नाही. पण ती बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याच्या ज्या काही बातम्या आहेत, त्या निव्वळ अफवा असल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे. योग्यवेळी आम्ही स्वत: सगळ्या गोष्टी जाहिर करू, असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, इकडे प्रवक्त्याने हे स्पष्टीकरण दिले अन् तिकडे प्रियांकाने एका मुलाखतीत आपल्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्टबद्दलचे संकेत दिलेत. पुढील वर्षी बॉलिवूडचे दोन चित्रपट साईन करण्याची तयारी आहे. पण मी घाईत नाही. कारण पुढील वर्षी मार्चपर्यंतचा वेळ माझ्याकडे आहे. बॉलिवूडमध्ये सध्या उत्तम चित्रपट बनत आहेत. गत वर्षभरात अनेक फिल्म्समेकर्स माझ्याकडे उत्तम कथा घेऊन आलेत. पण यादरम्यान अनेक गोष्टी आहेत. इथे आणि तिथेही, असे प्रियांका म्हणाली. या बॉलिवूड चित्रपटांची घोषणा कधी करणार? असे प्रियांकाला विचारण्यात आले. यावरही प्रियांकाला अगदी स्पष्टपणे उत्तर दिले. चित्रपट साईन केल्यावर लवकरात लवकर. हे मी करतेय आणि ते पब्लिक करा, असा आततायीपणा माझ्यात नाही. चित्रपट सुरु केल्यावर त्याच्याबद्दल बोलणे मला आवडते.   ठोस असेल तरच मी बोलते. अशा ठोस गोष्टींवर लोकांचा चटकन विश्वास बसतो नाहीतर सगळ्याच चर्चा अन् अफवा ठरतात, असे ती म्हणाली.

ALSO READ : प्रियांका चोप्रा घेणार का बॉलिवूड मधून संन्यास?

एकंदर काय तर, प्रियांका यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला बॉलिवूडमध्ये नक्की दिसणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांना आनंद साजरा करायला हरकत नाही. तुम्ही हा आनंद कसा साजरा करणार, हे आम्हाला सांगायला विसरू नका. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.

Web Title: Saneasaha all the lies! Priyanka Chopra to do two Bollywood movies in March 2018 !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.