सना खानला लागली लॉटरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 17:21 IST2016-05-03T11:51:49+5:302016-05-03T17:21:49+5:30

‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसलेली सना खान हिला मोठी लॉटरी लागली आहे. होय, सनाला भूषणकुमार यांचा एक मोठा चित्रपट ...

Sana Khan took lottery !! | सना खानला लागली लॉटरी!!

सना खानला लागली लॉटरी!!


/>
‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसलेली सना खान हिला मोठी लॉटरी लागली आहे. होय, सनाला भूषणकुमार यांचा एक मोठा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटात सना लीड रोलमध्ये दिसणार आहे. या इरॉटिक-थ्रीलर चित्रपटाचे नाव आहे, ‘वजह तुम हो’. विशाल पंड्या यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाºया या चित्रपटात सनाच्या अपोझिट एक नाही तर चार चार हिरो असतील. यातील दोन हिरो म्हणजे शरमन जोशी व गुरमीत चौधरी. अन्य दोन हिरोंची नावे अद्याप फायनल झालेली नाहीत. यात सना महिला वकीलाची भूमिका साकारताना दिसेल. म्हणजेच सना एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. पण सोबतच ग्लॅमरचा तडकाही असेल. या सस्पेंस-थ्रिलर चित्रपटासाठी विशाल पंड्या यांनी वर्कशॉपची तयारीही चालवली आहे. आता इतकी मोठी लॉटरी लागल्यावर बबली गर्ल सना आनंदात नसेल तर काय??

Web Title: Sana Khan took lottery !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.