​ सना खान म्हणते, जबरदस्तीने सलमानच्या गळ्यात पडायला मी वेडी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 10:34 IST2017-08-04T05:04:18+5:302017-08-04T10:34:18+5:30

अलीकडे सलमान खान आणि सना खान या दोघांचा एक फोटो चांगलाच गाजला. एका अवार्ड शोदरम्यान सलमान व सना एकमेकांसमोर ...

Sana Khan says, "I'm not crazy to go to Salman's neck." | ​ सना खान म्हणते, जबरदस्तीने सलमानच्या गळ्यात पडायला मी वेडी नाही

​ सना खान म्हणते, जबरदस्तीने सलमानच्या गळ्यात पडायला मी वेडी नाही

ीकडे सलमान खान आणि सना खान या दोघांचा एक फोटो चांगलाच गाजला. एका अवार्ड शोदरम्यान सलमान व सना एकमेकांसमोर आले. मग काय, बॉलिवूड स्टाईलने त्यांची गळाभेट झाली. सना अगदी कडकडून सलमानला मिठी मारताना दिसली. पण सलमान? सनाला मिठी मारताना सलमानच्या मुठी आवळलेल्या होत्या. यावरून अंदाज काढला गेला. काय तर, सनाला मिठी मारताना सलमान अनकम्फर्टेबल होता. काहीशा नाखुशीने त्याने सनीची गळाभेट घेतली होती.  सना व सलमानचा या गळाभेटीचा फोटो मग चांगलाच ट्रोल झाला. अनेकांनी तर यानिमित्ताने थेट सनाला टार्गेट केले. नक्कीच सना, सलमानच्या गळ्यात पडली असेल, इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या. आता यावर सलमान काही बोलणार, याची शक्यता नाही. कारण भाईच्या ‘शान’ला ते शोभणारे नाही. मग उरली सना. सना यावर काय बोलते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले. पण सनानेही यावर मौन बाळगणे पसंत केले. पण मीडियाने पिच्छा पुरवल्यावर मात्र तिचा राग बाहेर आलाच.



सलमानसोबतच्या या फोटोवरून ट्रोल करणा-यांवर ती चांगलीच बरसली. एक लहान गोष्टीचा लोकांनी किती बाऊ करावा? मला तर विश्वासच बसत नाहीय. अगदी सामान्यपणे गळाभेट घेतानाच्या एका फोटोवरून इतके मोठे रामायण घडावे, याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझी गळाभेट घेताना सलमानच्या मुठी आवळलेल्या होत्या, केवळ यावरून मला ट्रोल केले जात आहे. एखाद्याच्या इच्छेविरूद्ध मी त्याच्या गळ्यात पडायला पागल नाही.  सलमान मला ओळखतच नाही, असे मुळीच नाही. कदाचित त्याची तीच स्टाईल असावी. आम्ही चांगले मित्र आहोत. आता असे असूनही मला भेटताना त्याच्या मुठी का आवळलेल्या होत्या, हे मी कसे सांगणार? याचे उत्तर तर सलमान स्वत: देऊ शकतो ना. त्या अवार्ड फंक्शनमध्ये मी व सलमान दोन मिनिटांसाठी बोललो होतो. मी खूप सुंदर दिसतेय, असे तो मला म्हणाला होता. यावर, मी सात किलो वजन कमी केलेय, असे मी म्हणाले होते. त्यावर ते तर दिसतयं, असे तो मला म्हणाला होता. मी बॅकलेस ड्रेसमध्ये होते, म्हणून सलमान मला भेटताना कम्फर्टेबल नव्हता असे म्हणणे चूक ठरेल. कारण सलमान २५ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि त्याने यापेक्षा अधिक पाहिले आहे, असे सना म्हणाली. 

Web Title: Sana Khan says, "I'm not crazy to go to Salman's neck."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.