‘तडका’ मधून समीर दीक्षितची बॉलीवूड एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 18:14 IST2016-04-26T12:44:03+5:302016-04-26T18:14:03+5:30
समीर दीक्षित हे ‘तडका’ निर्मितीक्षेत्रातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर, श्रिया सरन, अली फजल, तापसी पन्नू हे दिसणार ...

‘तडका’ मधून समीर दीक्षितची बॉलीवूड एन्ट्री!
स ीर दीक्षित हे ‘तडका’ निर्मितीक्षेत्रातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर, श्रिया सरन, अली फजल, तापसी पन्नू हे दिसणार आहेत. ते म्हणतात,‘ चित्रपटनिर्मिती मी अनेक वर्षांपासून करणार होतो. पण, मला योग्य स्क्रिप्टची वाट पाहायची होती. त्यामुळे ‘तडका’ हा चित्रपट माझ्या निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी अगदी योग्य आहे. हा चित्रपट एका मध्यमवयीन जोडप्याच्या खाद्यप्रेमाविषयी आहे. त्यांचे दिसणे आणि त्यांचे वय यामुळे त्यांच्यात गैरसमज होतात.
त्यांच्या आयुष्यातील अप्स अॅण्ड डाऊन्स यावर चित्रपट आधारित असून त्यांच्यातच केवळ गैरसमजुती होत नाहीत तर त्यांच्यासोबतचे दुसरे जोडपे अली आणि तापसी यांच्यातही होतात.
त्यांच्या आयुष्यातील अप्स अॅण्ड डाऊन्स यावर चित्रपट आधारित असून त्यांच्यातच केवळ गैरसमजुती होत नाहीत तर त्यांच्यासोबतचे दुसरे जोडपे अली आणि तापसी यांच्यातही होतात.