​जॉनचा सैनिकांना सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:50 IST2016-10-21T20:27:01+5:302016-10-22T09:50:01+5:30

सेनेने केलेल्या सर्जीकल स्ट्राईकला सलाम करणारे गाणे यूट्युबवर लाँच करण्यात आले आहे.

Salute to John's soldiers | ​जॉनचा सैनिकांना सॅल्यूट

​जॉनचा सैनिकांना सॅल्यूट

ong>लवकरच जॉन अब्राहम त्याच्या आगामी ‘फोर्स 2’ या चित्रपटातून दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेला दिसणार आहे. मात्र यापूर्वी त्याने उरी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने केलेल्या सर्जीकल स्ट्राईकला सलाम करणारे गाणे यूट्युबवर लाँच करण्यात आले आहे. जॉनच्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रसंशा केली जात आहे. या गाण्यात जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा सीमेवर लढणाºया जवानांना सॅल्यूट करताना दिसतेय. 

‘फोर्स 2’साठी नुकतेच जॉनने ‘रंग लाल’ हे गाणे शूट केले होते. यात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना सॅल्यूट करणारे हे गाणे देशभक्तीपर गीत आहे. देशावर कुणीही आक्रमण केल्यास त्यांना चांगलाच धडा शिकविला जाईल असा या गाण्याचा गाभा आहे. या गाण्यातील ‘लाल रंग’ म्हणजे देशभक्तीच्या तीव्र भावनांचे प्रतिक म्हणून दर्शविण्यात आले आहे. हे गाणे देवा नेगी याने गायले असून जॉनने गाण्यादरम्यान देशभक्ती जागविणारे डॉयलॉग म्हंटले आहेत. 

जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. जॉन-जेनेलियाची प्रमुख भूमिका असलेल्या फोर्सचा तो सिक्वल असेल. या चित्रपटात जॉन मुंबई पोलीस दलातील एका अधिकाºयाची भूमिका केली आहे. हा पोलीस अधिकारी एका सिक्रेट मिशनवर असून तो दहशतवाद्यांचा खात्मा करतो. ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील ‘अ‍ॅक्शन पॅक्ड’ अवतारात दिसणार आहे. 
चला तर पाहूया हे गाणे...

Web Title: Salute to John's soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.