‘ट्युबलाईट’मध्ये सलमानचा आवाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 19:39 IST2016-07-27T14:09:55+5:302016-07-27T19:39:55+5:30
सलमान खानला फक्त कॅमेºयासमोर उभे करायचे आणि चित्रपट सुपरहिट, हे जणू अलीकडे समीकरण झाले आहे. सन २००९ मध्ये सलमानचा ...
.jpg)
‘ट्युबलाईट’मध्ये सलमानचा आवाज!!
स मान खानला फक्त कॅमेºयासमोर उभे करायचे आणि चित्रपट सुपरहिट, हे जणू अलीकडे समीकरण झाले आहे. सन २००९ मध्ये सलमानचा ‘वॉन्टेड’ आला आणि यानंतर सलमानने मागे वळून बघितलेच नाही. एकापाठोपाठ एक सुपरहिट देणारा सलमान सध्या बॉलिवूडचा ‘खान’ झाला आहे. ‘सुल्तान’ तुफान यशस्वी ठरल्यानंतर सलमानच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु झाली आहे. कबीर खानच्या ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान दिसणार आहे. उद्या २८ जुलैपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी अपडेट द्यायचे तर सलमान या चित्रपटासाठी गाणार आहे. होय, सलमानच्या आवाजातील गाणे ‘ट्युबलाईट’मध्ये असणार आहे. स्वत: सलमाननेच याचे संकेत दिलेत. तेव्हा वेट अॅण्ड वॉच!