सलमानचा ‘तुफानी’ प्रवास संपला; हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:54 IST2016-10-20T12:07:45+5:302016-10-20T12:54:44+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणजे सलमान खान. चित्रपट आणि एंडोर्समेंटमधून सलमान खान ‘तुफानी’ कमाई करतोय. पण एका मोठ्या ब्रँडने सलमानला टाटा ...

Salman's 'Tuffani' journey ends; This is because! | सलमानचा ‘तुफानी’ प्रवास संपला; हे आहे कारण!

सलमानचा ‘तुफानी’ प्रवास संपला; हे आहे कारण!

लिवूडचा ‘दबंग’ म्हणजे सलमान खान. चित्रपट आणि एंडोर्समेंटमधून सलमान खान ‘तुफानी’ कमाई करतोय. पण एका मोठ्या ब्रँडने सलमानला टाटा -बाय-बाय करत ‘बॉलिवूडचा बाजीराव’ रणवीर सिंह याला जवळ केले आहे. होस, ‘आज कुछ तुफानी करते है...’ म्हणत थम्प-अपची बाटली गटागट पोटात रिचवणारा सलमान जाहिरातींमध्ये आपल्याला येत्या काळात दिसणार नाही. होय, या कोल्ड ड्रिंक ब्रांडने आता आपल्या ब्रांड जाहिरातीसाठी सलमानला रिप्लेस करून रणवीरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.



सलमानला डच्चू का?
सलमान सध्या लोकप्रीयतेच्या शिखरावर आहे. त्याच्या ‘सुल्तान’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ‘बिग बॉस’मुळेही तो चर्चेत आहे.अशावेळी संबंधित कोल्ड ड्रिंक ब्रांडने सलमानला रिप्लेस करण्याचा निर्णय घेणे, आश्चर्यचकित करणारे आहे. पण या निर्णयामागे एक खास कारण आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामागे कारण आहे,‘बिग बॉस’. होय, सलमान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’मुळे संबंधित कोल्ड ड्रिंक ब्रांडने सलमानसोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस’चे स्पॉन्सर यावेळी ‘एप्पी’आहे. म्हणजेच ‘थम्सअप’चे प्रतिस्पर्धी ब्रांड ‘बिग बॉस’ला स्पॉन्सर करत आहे. याचा अप्रत्यक्ष ‘बदला’ म्हणून संबंधित कोल्ड ड्रिंक ब्रांडने सलमानला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. आपला ब्रँड अ‍ॅम्बेसीडर असताना सलमान ‘बिग बॉस’च्या मंचावरून दुसºया कोल्ड ड्रिंकचा प्रचार करावा, ही बाब  संबंधित कोल्ड ड्रिंक ब्रांडच्या गळी उतरणारी नव्हतीच. म्हणूनच सलमानचा ‘तुफानी’ प्रवास संपला आहे.

सन २०००मध्ये २०१२ पर्यंत अक्षय कुमार या ब्रांडच्या जाहिराती करताना दिसला. यानंतर २०१२मध्ये सलमान या जाहिरातींमध्ये दिसू लागला. गत चार वर्षांत सलमान या ब्रांडची ओळख बनला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान व कंपनीमधील करार गत महिन्यात संपला. पण आता कंपनी सलमानला सोबत ठेऊ इच्छित नाही.

Web Title: Salman's 'Tuffani' journey ends; This is because!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.