सलमानच्या ‘ट्युबलाईट’चे मनाली शूटींग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 12:16 IST2016-10-22T12:10:06+5:302016-10-22T12:16:20+5:30

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचे मनाली येथे सुरू असणारी शूटींग पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक कबीर खानने इन्स्टाग्रामवर सलमानचा एक ब्लॅक ...

Salman's 'Tubelite' Manali shootout is complete | सलमानच्या ‘ट्युबलाईट’चे मनाली शूटींग पूर्ण

सलमानच्या ‘ट्युबलाईट’चे मनाली शूटींग पूर्ण

मान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचे मनाली येथे सुरू असणारी शूटींग पूर्ण झाले आहे. दिग्दर्शक कबीर खानने इन्स्टाग्रामवर सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिली की, सलमानचे मनालीतील शूटींग संपली असून आम्हीसुद्धा पुढील तीन दिवसांत चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करीत आहोत. पुढील वर्षी ईदला ‘ट्युबलाईट’सह भेटूच.

या कृष्णधवल फोटोमध्ये सलमान पायऱ्यांवर बसलेला आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली असल्यामुळे त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु आतापर्यंत बाहेर आलेल्या फोटोंवरून सलमान एका सैनिकाच्या भूमिकेत आहे, एवढे दिसतेय.

                              

सदरील चित्रपट १९६२ साली झालेल्या चीन युद्धावर आधारित असून सलमान खानचे पात्र एका चीनी मुलीच्या प्रेमात पडते अशी कथेची मांडणी सांगितली जातेय. यामध्ये सलमानसोबत प्रथमच चीनी अभिनेत्री झु झु मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तसेच त्याचा भाऊ सोहेल खानसुद्धा रुपेरी पडद्यावर मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा दिसणार आहे.

कबीर खानसोबत सलमानचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन ब्लॉकबस्टर सिनेमांत एकत्र काम केले आहे. दोन्हीही चित्रपटांची बॉक्स आॅफिस धमाल ‘ट्युबलाईट’ आणखी पुढे नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Salman's 'Tubelite' Manali shootout is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.