इथे होणार सलमानच्या ‘ट्युबलाईट’चे शूटींग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 16:07 IST2016-07-25T10:37:44+5:302016-07-25T16:07:44+5:30
सलमान खानचा ‘सुल्तान’ बॉक्सआॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. काळवीट शिकार प्रकरणातूनही त्याची सुटका झाली. या दुहेरी आनंदात सलमानच्या नव्या चित्रपटाचे ...

इथे होणार सलमानच्या ‘ट्युबलाईट’चे शूटींग!
स मान खानचा ‘सुल्तान’ बॉक्सआॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. काळवीट शिकार प्रकरणातूनही त्याची सुटका झाली. या दुहेरी आनंदात सलमानच्या नव्या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान यांचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा सलमान आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येतो आहे. या चित्रपटाच्या लोकेशनचा फोटो कबीर यांनी आज सोशल मीडियावर शेअर केला. ‘२८ तारखेपासून चित्रीकरणास सुरवात होईल. #Tubelight @BeingSalmanKhan. तुम्ही सुद्धा उत्सुक आहात ना?’,असे टिष्ट्वट कबीर यांनी केले आहे. हा चित्रपट कबीरचा आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचे म्हटले जातेय. सलमान खान पहिल्यांदाच लडाख येथे शूटींग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील सर्व कलाकार आणि टीम जवळपास महिनाभर लडाख येथे शूटींग करणार आहेत. ‘बजरंगी भाईजान’च्या वेळी सलमानने पहिल्यांदाच काश्मिरमध्ये शूटींग केले होते. त्यावेळी काश्मिरच्या सौंदयार्ने तो भारावून गेला होता. आता बहुदा तो त्याच्या चित्रपटांसोबतच लोकेशन्सवरही बराच विचार करत असल्याचे दिसते.
So here we are... It all begins on the 28th... #Tubelight