सलमानची बहिण अर्पिताकडे चोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 15:48 IST2016-08-23T10:18:17+5:302016-08-23T15:48:17+5:30
अभिनेता सलमान खान याची लाडकी बहिण अर्पिता खान हिच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे. अर्पिताच्या घरातून तब्बल ३.२५ लाखाचे ...

सलमानची बहिण अर्पिताकडे चोरी!
अ िनेता सलमान खान याची लाडकी बहिण अर्पिता खान हिच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे. अर्पिताच्या घरातून तब्बल ३.२५ लाखाचे सोने आणि रोख रक्कम तसेच काही डिझायनर कपडे चोरीला गेले आहेत. यासंबंधी तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिच्या घरी काम करणा-या मोलकरणीला ताब्यात घेतले आहे.अफसा खान असे या मोलकरणीचे नाव आहे. अर्पिता ही वांद्रे (पश्चिम) येथे शेर्ली राजन रोड येथील प्लश पॅसिफिक हाइट्स येथे राहते. तिच्या घरी काम करणारी ३५ वर्षीय मोलकरीण अफसा खान ही रविवारपासून कामावर न आल्याने सदर घटना उघडकीस आली. अफसा ही अर्पितासोबतच तिच्या घरी राहून काम करत असे. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर अर्पिताचा ड्रायव्हर आणि शेजारी काम करणा-या नोकरांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारा येथील आरोपीच्या घरातून अफसा खान हिला अटक केली. गेल्या दीड वषार्पासून अफसा ही अर्पिताच्या घरी काम करत होती. पण पोलीस ठाण्यात तिचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हते. अर्पिता खान ही सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. अर्पिता खानने २०१४ साली हिमाचल प्रदेशच्या आयुष शर्मा याच्याशी प्रेम विवाह केला होता. सलमानने अगदी थाटामात आपल्या बहिणीचे लग्न लावले होते. अर्पिताला अहिल हा गोंडस मुलगा असून त्याचा जन्म मार्च महिन्यात जन्म दिला होता.