​सलमानवर बलात्कारपीडितेने ठोकला १० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 21:54 IST2016-06-25T16:24:58+5:302016-06-25T21:54:58+5:30

बलात्कार पीडितेबाबत केलेले वक्तव्य सलमान खानला चांगलेच महागात पडणार आहे. हिस्सारच्या एका बलात्कार पीडितेने सलमानविरोधात १० कोटी रूपयांचा दावा ...

Salman's rape victim claims Rs 10 crores | ​सलमानवर बलात्कारपीडितेने ठोकला १० कोटींचा दावा

​सलमानवर बलात्कारपीडितेने ठोकला १० कोटींचा दावा

ात्कार पीडितेबाबत केलेले वक्तव्य सलमान खानला चांगलेच महागात पडणार आहे. हिस्सारच्या एका बलात्कार पीडितेने सलमानविरोधात १० कोटी रूपयांचा दावा ठोकला आहे. या पीडितेचे वकील रजत कल्सन यांनी सलमानला कायदेशीर नोटीस पाठवले आहे. सलमानने बलात्कार पीडितेबाबत केलेले वक्तव्य मला मीडियाकडून समजले. त्याने बलात्काराची वेदना झेलणाºया महिलांची टर उडवली आहे. मी पण एक बलात्कार पीडिता आहे. मीही बलात्कारासारखे संतापजनक कृत्याची शिकार ठरलेली आहे. सलमानच्या वक्तव्याने त्या भयानक व अंगाचा थरकाप उडवणाºया घटनेच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. सलमानच्या या अपमानास्पद वक्तव्यामुळे मला माझे आयुष्य ओझे वाटू लागले आहे. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहे, असे या पीडितेने आपल्या नोटीसमध्ये लिहिले आहे. मी आधी सलमानची चाहती होती. पण त्याच्या या वक्तव्याने मला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटू लागला आहे, असेही तिने म्हटले आहे.
पीडितेच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला कायदेशीर नोटीस बजावणाºया या मुलीवर सुमारे चार वर्षांपूर्वी हिस्सारमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. हिस्सारच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप ठोठावली आहे. तर अन्य चार आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे.

‘सुल्तान’साठी सहा तास सलग शुटींग करताना  मला अनेकदा उचलून जमिनीवर आपटलं जायचे. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचे, असे वक्तव्य सलमानने एका मुलाखतीत केले होते. त्याच्या या वक्तव्यावरूनच वाद निर्माण झाला आहे.

Web Title: Salman's rape victim claims Rs 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.