​ सलमानचे हे पेन्टिंग बघून व्हाल भावूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:00 IST2016-07-23T16:29:26+5:302016-07-23T22:00:53+5:30

पेन्टिंग्स् हा सलमानचा आवडता छंद. त्याचे प्रत्येक पेन्टिंग प्रेम, एकता याचा गर्भित संदेश देणारे असते. आपल्या काही पेन्टिंग त्याने बॉलिवूडमधील त्याच्या काही मित्रांना भेट म्हणूनही दिल्या आहेत. त्याचे अगदी अलीकडचे सेल्फ पोट्रेट आहे ते मायसन व मायजॉन यांच्यावरचे.

Salman's painting will be seen in the painting! | ​ सलमानचे हे पेन्टिंग बघून व्हाल भावूक !

​ सलमानचे हे पेन्टिंग बघून व्हाल भावूक !

मान खान बॉक्स आॅफिसवरचे रेकॉर्ड तोडत नसतो तेव्हा तो काय करतो...पेन्टिंग..होय, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मनाला भावणाºया गोष्टींच्या पेन्टिंग्स् बनवणे, हा सलमानचा आवडता छंद. त्याचे प्रत्येक पेन्टिंग  प्रेम, एकता याचा गर्भित संदेश देणारे असते. आपल्या काही पेन्टिंग त्याने बॉलिवूडमधील त्याच्या काही मित्रांना भेट म्हणूनही दिल्या आहेत. त्याचे अगदी अलीकडचे सेल्फ पोट्रेट आहे ते मायसन व मायजॉन यांच्यावरचे. मायसन व मायजान म्हणजे सलमानचे लाडके डॉगीज. सात वर्षांपूर्वी या दोन्ही कुत्र्यांचा मृत्यू झाला. पण सलमान अद्यापही या कुत्र्यांना विसरू शकलेला नाही. आपल्या पेन्टिंगमध्ये सलमानने त्याच आठवणी जणू जिवंत केल्या आहेत. एवढेच नाही तर महबूब स्टुडिओबाहेर मायसन व मायजान या दोन्ही कुत्र्यांच्या नावाचा एक प्लाक (धातू, दगड वा लाकडापासून तयार केलेला बेस. ज्यावर काही अक्षरे वा चित्र कोरलेले असते.) बसवला आहे.



मार्बलच्या या प्लाकवर मायजान व मायसन दोघांची चित्रे आहेत आणि खाली त्यांची नावेही आहेत. सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच हा प्लाक उभारण्यात आला आहे. अर्थात यावर सलमानचे नाव नाही. कदाचित वादापासून लांब राहण्यासाठी त्याने या प्लाकवर नाव लिहिणे टाळले असावे. पण सलमान मायसन व मायजानला विसरू शकलेला नाही, हेच यावरून दिसले.


 
२००९ मध्ये मायसनचा मृत्यू झाला होता. यानंतर काहीच महिन्यांत मायजानही आजारी पडला होता. सलमानचा डेब्यू प्रॉडक्शन चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ याच कुत्र्यांच्या स्मृतीत बनवण्यात आला होता, असे मानले जाते. यात काही मुले एक बेवारस कुत्र्याला वाचवण्यासाठी सगळ्यांशी लढतात,असे याचे कथानक होते.  


 

Web Title: Salman's painting will be seen in the painting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.