n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">काळवीट शिकारप्रकरणी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सलमान खानची दोन्ही प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होता असा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी गेली अठरा वर्षं खटला सुरू होता, मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या सुनावणीच्या विरोधात सलमानने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयाने आज सलमानची दोन प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 12 ऑक्टोबर 1998च्या रात्री जोधपूरच्या कनकनी गावात सलमानने काळविटाची शिकार केली होती, असा त्याच्यावर आरोप होता. त्याच्यावर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावरही काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. वांद्रे हिट अँड रन प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर सलमानला आता काळवीट प्रकरणातही दिलासा मिळाला आहे.