सलमानच्या वाढदिवसाला दिसणार का ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:50 IST2016-12-18T10:37:11+5:302016-12-19T10:50:33+5:30
बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतूरतेने वाट पाहणाºया तमाम फॅन्सना तो त्याच्या ...

सलमानच्या वाढदिवसाला दिसणार का ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर?
ब लीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतूरतेने वाट पाहणाºया तमाम फॅन्सना तो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक विशेष सरप्राईज देणार आहे. याची घोषणा स्वत: त्याने ट्विट करून केली.
‘दंबग’ खानने ट्विट केले की, ‘तयार राहा. आ रहा है बडा सरप्राईज! लवकरच. #बर्थडेसरप्राईज’.
आता हे सरप्राईज म्हणजे ‘सो कॉल्ड’ गर्लफ्रेंड युलिया वेंटूरशी लग्न करत असल्याची घोषणा तर नसेल ना!? लगेच एवढा वाईल्ड गेस करू नका. येत्या २७ डिसेंबरला सलमान ५१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यादिवशीच कळेल की, हे सरप्राईज काय असेल.
सलमान सध्या ‘बिग बॉस १०’ आणि कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यावरून जर अंदाज बांधायचा ठरवला तर ‘ट्युबलाईट’चे स्पेशल टीझर बर्थडेला रिलीज केले जाऊ शकते. ही शक्यता जरा जास्त योग्य वाटतेय, हो ना? कारण मागच्या काही दिवसांपासून सलमान ट्विटरवर चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो शेअर करीत आहे.
पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणाºया या चित्रपटात सलमानबरोबर चीनी अभिनेत्री झू झू झळकणार आहे. तसेच लहान भाऊ सोहेल खानचीसुद्धा यामध्ये भूमिका आहे. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा बेतल्याचे सांगण्यात येतेय. कबीर खान-सलमान खान या दिग्दर्शक-अभिनेता द्वयीचा ‘ ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’नंतर ट्युबलाईट’ हा तिसरा सिनेमा आहे.

Get ready . Aa raha hai bada surprise ! #ComingSoon#BirthdaySurprise .— Salman Khan (@BeingSalmanKhan) 17 December 2016
आता हे सरप्राईज म्हणजे ‘सो कॉल्ड’ गर्लफ्रेंड युलिया वेंटूरशी लग्न करत असल्याची घोषणा तर नसेल ना!? लगेच एवढा वाईल्ड गेस करू नका. येत्या २७ डिसेंबरला सलमान ५१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यादिवशीच कळेल की, हे सरप्राईज काय असेल.
सलमान सध्या ‘बिग बॉस १०’ आणि कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यावरून जर अंदाज बांधायचा ठरवला तर ‘ट्युबलाईट’चे स्पेशल टीझर बर्थडेला रिलीज केले जाऊ शकते. ही शक्यता जरा जास्त योग्य वाटतेय, हो ना? कारण मागच्या काही दिवसांपासून सलमान ट्विटरवर चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो शेअर करीत आहे.
एका फोटोमध्ये तो टिपिकल शिमला स्टाईल स्वेटरमध्ये असून छातीजवळ दोन्ही हातांनी पुस्तक धरून जाताना दिसतो. दुसºया एका फोटोत तो लहान मुलांसमोर अत्यंत आनंदाने नाचताना दिसतो. गाण्याच्या शूटींग दरम्यानचा हा फोटो असेल. त्यामुळे कदाचित २७ डिसेंबरला टीझर किंवा फर्स्ट लूक अथवा मोशन पोस्टर रिलीज केले जाऊ शकते.pic.twitter.com/a9QTgChIgV— Salman Khan (@BeingSalmanKhan) 14 December 2016