​सलमान म्हणतो,‘कोण सुशांत?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 10:28 IST2016-06-30T04:58:50+5:302016-06-30T10:28:50+5:30

खरंच, सलमान खानसारखे स्टारडम कोणीच जगत नाही. आपल्याच दुनियेत मस्तमगन राहणाऱ्या सल्लूमियांला जणूकाही बाहेरच्या जगाची काहीच खबर नसते असे ...

Salman says, 'Who is Sushant?' | ​सलमान म्हणतो,‘कोण सुशांत?’

​सलमान म्हणतो,‘कोण सुशांत?’

ंच, सलमान खानसारखे स्टारडम कोणीच जगत नाही. आपल्याच दुनियेत मस्तमगन राहणाऱ्या सल्लूमियांला जणूकाही बाहेरच्या जगाची काहीच खबर नसते असे वाटतेय.

त्याचे झाले असे की, ‘बजरंगी भाईजान’नंतर सलमान करण जोहरसोबत मिळून एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतला कास्ट करण्यात येणार असल्याचे इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती.

म्हणून मग जेव्हा सलमानला याबद्दल विचारले तेव्हा त्याने प्रतिप्रश्न केला की, ‘सुशांत कोण आहे?’ जेव्हा त्याला अभिनेता सुशांत राजपूतबद्दल सांगितले तेव्हा देखील त्याला कळाले नाही.  

तो म्हणाला, नाही माहित बुवा. आणि तसेही मी त्याच्यासोबत का फिल्म करू?

आता बिचाऱ्या सुशांतने भाईजानसोबत कसलाच पंगा घेतलेला नाहीए. मग तरीदेखील सलमान असे विचारावे? दोघांनी जरी कधी सोबत काम केलेले नसले तरी निदान सुशांत कोण हे तरी त्याला माहित असावे. आता खरे काय हे तोच जाणे.

Web Title: Salman says, 'Who is Sushant?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.