करणला सलमानने करून दिली आठवण; म्हणाला काहीच बदलले नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 19:59 IST2016-12-07T19:59:31+5:302016-12-07T19:59:31+5:30
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’च्या १०० व्या भागात सलमान खान बंधू हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये करणने सलमानला विचारलेल्या ...

करणला सलमानने करून दिली आठवण; म्हणाला काहीच बदलले नाही!
क ण जोहरच्या ‘कॉफी विद करण’च्या १०० व्या भागात सलमान खान बंधू हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये करणने सलमानला विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे. ‘‘काय तू आजही व्हर्जिन आहेस’’असा प्रश्न करणने विचारल्यावर सलमानने ‘‘काहीच बदलेले नाही’’ असे उत्तर दिले आहे.
‘कॉफी विद करण’ या शोचे पाचवे सिजन सध्या टीव्हीवर सुरू आहे. या शोला चांगलीच प्रसिद्धी मिळते आहे. करणच्या शोमध्ये बॉलिवूडमधील बहुतेक सर्व सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. कॉफी विद करणचा १०० वा भाग लवकरच प्रसारित केला जाणार असून, यात खान बंधू हजेरी लावणार आहेत. सलमानसह अरबाज व सोहेल हे देखील शोमध्ये करणच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतील.
कॉफी विद करणच्या १०० व्या भागाचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण सलमानला एक प्रश्न विचारत आहे. करण म्हणतो, काय तू आजही व्हर्जिन आहेस? यावर सलमान म्हणतो ‘काहीच बदललेले नाही’. कॉफी विद करणच्या चौथ्या सिजनमध्ये करणने सलमानला हाच प्रश्न विचारला होता. यावर सलमानने होय असे उत्तर दिले होते. यावेळी त्याने तोच प्रश्न विचारल्याने सलमानने मागील वेळी दिलेल्या उत्तराची आठवण करून दिली.
करणने सलमानला आणखी एक प्रश्न विचारला. ती अभिनेत्री (कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा व प्रियांका चोप्रा) पैकी कुणासोबत तू लग्न, हूक अप किंवा मैत्री करू इच्छितो? यात सोहेल खानने आणखी एक आॅप्शन जोडले. सोहेलने राखी सावंतचे नाव घेतले, यावर अरबाज म्हणाला, पहा आणखी एक आॅप्शन जोडले गेले आहे. या शोमधील चौघांचा संवाद पाहून हा भाग मजेदार असेल असे दिसते.