सलमान खानची ‘ट्यूबलाइट’ पेटलीच नसल्याने ‘या’ अभिनेत्रीने भारतात येण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 15:02 IST2017-07-01T09:32:18+5:302017-07-01T15:02:18+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर घोर निराशा केल्याने, निर्मात्यांना त्याचा चांगलाच फटका सहन ...

Salman Khan's 'tube light' is not bellyache, the actress refused to come to India! | सलमान खानची ‘ट्यूबलाइट’ पेटलीच नसल्याने ‘या’ अभिनेत्रीने भारतात येण्यास दिला नकार!

सलमान खानची ‘ट्यूबलाइट’ पेटलीच नसल्याने ‘या’ अभिनेत्रीने भारतात येण्यास दिला नकार!

लिवूडचा दबंग सलमान खान याच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर घोर निराशा केल्याने, निर्मात्यांना त्याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. तब्बल सहा दिवसांनंतर शंभर कोटी पार केलेल्या या चित्रपटाला यापेक्षा मजल मारणे आता अवघड होत आहे. कारण बºयाचशा मल्टीप्लेक्स चालकांनी चित्रपटाचे शो रद्द केल्याने सिंगल स्क्रीनवरच चित्रपट दाखविला जात आहे. त्यामुळे कमाईचे आकडे वाढणे आता मुश्किल झाले आहे. 

विशेष म्हणजे ‘ट्यूबलाइट’ पेटली नसल्याने चित्रपटातील चिनी अभिनेत्री झू झू हिनेही सलमानची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सुरुवातीला अशा बातम्या आल्या होत्या की, चित्रपटातील चिनी अभिनेत्री झू झू ‘ट्यूबलाइट’च्या रिलीजनंतर भारतात येणार आहे. मात्र बॉक्स आॅफिसवरील आकडे पाहता झू झूने आता भारतात येण्यास नकार दिला आहे. शिवाय ती निर्मात्यावरही चांगलीच नाराज असल्याचे समजते. 



डीएनएने दिलेल्या माहितीनुसार झू झू ‘ट्यूबलाइट’च्या बॉक्स आॅफिसवरील कलेक्शनमुळे खूपच नाराज झाली आहे. त्यातच तिची ज्या पद्धतीने दाखविण्यात आली आहे, त्यावरूनही झू झू चांगलीच भडकली आहे. सूत्रानुसार झू झू तिचा ‘फलम’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भारतात येणार होती. त्यासाठी तिने प्लॅनही केला होता. परंतु ‘ट्यूबलाइट’चे बॉक्स आॅफिसवरील आकडे पाहता तिने तिचा प्लॅन रद्द केला आहे. 

‘ट्यूबलाइट’ सलमान खान आणि कबीर खान जोडीचा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर हे दोघे ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे ‘ट्यूबलाइट’देखील असाच काहीसा करिष्मा दाखवेल अशी अपेक्षा या दोघांना होती. परंतु तसे घडले नसल्याने ही जोडी आता तुटताना दिसत आहे. सलमानचा विचार केल्यास, त्याच्यावर ‘ट्यूबलाइट’चा फारसा परिणाम होणार नाही. कारण ख्रिसमसला त्याचा ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Salman Khan's 'tube light' is not bellyache, the actress refused to come to India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.