​सलमान खानच्या पार्टीला पोहोचला ‘नवाब’ अन् झाली चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 11:39 IST2017-01-25T06:09:03+5:302017-01-25T11:39:03+5:30

सोमवारी रात्री उशीरा सलमान खानने आपल्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक जण पोहोचले. पण या ...

Salman Khan's party reached 'Nawab' and discussed! | ​सलमान खानच्या पार्टीला पोहोचला ‘नवाब’ अन् झाली चर्चा!

​सलमान खानच्या पार्टीला पोहोचला ‘नवाब’ अन् झाली चर्चा!

मवारी रात्री उशीरा सलमान खानने आपल्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक जण पोहोचले. पण या पार्टीत पोहोचलेल्या एका पाहुण्याची मात्र जरा जास्तच चर्चा झाली. हा पाहुणा कोण? तर सैफ अली खान. सैफ अली खान सलमानच्या पार्टीला पोहोचला आणि वेगवेगळ्या तर्क-विर्तकांना ऊत आला. काळवीट शिकार प्रकरणातून सलमानच्या निर्दोष सुटकेशी याचे कनेक्शन जोडले गेले.
सलमान नेहमी आपल्या घरी पार्टीचे आयोजन करतो. पण  सोमवारी रात्री रंगलेल्या पार्टीमागचे कारण काही वेगळे होते. ही पार्टी त्याने आपल्या छोट्या पाहुण्यासाठी केले होते. हा छोटा पाहुणा म्हणजे, ‘ट्युबलाईट’मध्ये सलमानसोबत काम करणारा बालकलाकार मार्टिन रे टंगू. सलमानने मार्टिनची जॅकी चॅनसोबतही भेट घालून दिली. यानंतर मार्टिनच्या सन्मानार्थ सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये ग्रॅण्ड पार्टी रंगली.


मार्टिन रे टंगू व सलमान

या वेळी सलमानची खास मैत्रिण युलिया वंटूर ही सुद्धा हजर होती. या पार्टीत सैफ अगदी नवाबी थाटात आला. खरे तर सलमान व सैफ या दोघांमध्ये कुठलेही मतभेद वा कटुता नाही. पण या भेटीची इतकी चर्चा व्हावी, याचे कारण काळवीट शिकार प्रकरण आहे. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात सलमानसोबत सैफ, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यावरही केस दाखल करण्यात आली होती.





काही दिवसांपूर्वी जोधपूर न्यायालयाने या प्रकरणाशी संंबंधित आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणातून सलमानची निर्दोष सुटका केली होती. कदाचित याबद्दल सलमानचे अभिनंदन करायला पटौदी नवाब या पार्टीस जातीने पोहोचला असावा.अर्थात हाही तर्क. या भेटीमागचे खरे कारण तर सैफ वा सलमानलाच ठाऊक!!
 

Web Title: Salman Khan's party reached 'Nawab' and discussed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.