सलमान खानच्या मेव्हुण्याने या अभिनेत्रीसोबत रोमांस करण्यास दिला नकार ? आता काय करणार भाईजान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:55 IST2017-09-15T12:25:44+5:302017-09-15T17:55:44+5:30

सलमान आपल्या मेहुण्याला म्हणजेच आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लवकरच लाँच करणार आहे ही बातमी सगळ्यांना माहिती आहे  आणि त्यासाठी त्यांनी ...

Salman Khan's mevuna refuses to romance with this actress? Now what will happen to brother-in-law? | सलमान खानच्या मेव्हुण्याने या अभिनेत्रीसोबत रोमांस करण्यास दिला नकार ? आता काय करणार भाईजान

सलमान खानच्या मेव्हुण्याने या अभिनेत्रीसोबत रोमांस करण्यास दिला नकार ? आता काय करणार भाईजान

मान आपल्या मेहुण्याला म्हणजेच आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लवकरच लाँच करणार आहे ही बातमी सगळ्यांना माहिती आहे  आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीदेखील केली आहे. सलमानच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाउसद्वारे एका रोमाँटिक चित्रपटातून तो आयुषला लाँच करणार आहे. 

पण आयुषने या अभिनेत्रीसोबत मी काम करू इच्छित नाही असे सांगून सलमानसमोर नवीन आव्हान उभे केले. सविस्तर बातमी अशी की सलमानला या चित्रपटात मौनी रॉयला घेण्याचे ठरवले होते पण आयुषचे म्हणणे आहे की माझ्या पहिल्या चित्रपटाची नायिका एकतर मोठी स्टार असेल किंवा पूर्णपणे नवीन ज्याने प्रेक्षकांना नवीन काहीतरी मिळेल.

पण सलमानने पहिलेच आपला निर्णय पक्का केला होता, सलमान खान आणि मौनी रॉय हे एकमेकांचे चांगले मित्र आहे, आता एकीकडे सलमानचा  मेहुणा तर दुसरीकडे त्याची खूप चांगली मैत्रिणी आता बघू सलमान काय निर्णय घेतो ते?

ALSO RAED : तब्बल सहावेळा दबंग सलमान खानला रिजेक्ट करणारी ‘ही’ अभिनेत्री ‘किक-२’मध्ये करणार त्याच्याशी रोमान्स!

आयुषला लाँच करताना हे काही पहिल्यांदा आलेली अडचण नाही. या आधीपण बऱ्याचशा गोष्टी घडल्या ज्याने आयुषचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले, सर्वात आधी कारण जोहर आयुषला लाँच करणार होता पण काही कारणास्तव त्याने बॅक आऊट केले त्यानंतर अशी उडती खबर ऐकण्यात आली की कॅटरिना कैफची बहीण आयुषबरोबर झळकणार. त्यानंतर आता मौनी रॉयच्या बाबतीत पण अजून काही सांगता येत नाहीये. आता हे पाहायचे आहे आयुषच्या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मौनी अक्षय कुमार स्टारर गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. याचित्रपटाचे काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये करण्यात आले आहे. हा चित्रपट भारतीय हॉकी ऑल्मिंपिकवर आधारित आहे. यात अक्षय भारताचे हॉकी कोच बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारतीय हॉकी संघाने बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा ऑल्मिंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. 15 ऑगस्ट 2018 ला गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

Web Title: Salman Khan's mevuna refuses to romance with this actress? Now what will happen to brother-in-law?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.