सलमान खानच्या ‘या’ पहिल्या एक्स गर्लफ्रेंडवर वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता बलात्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 17:54 IST2018-03-18T12:24:01+5:302018-03-18T17:54:01+5:30

पॉप सिंगर दलेर मेहंदीला १४ वर्षांपूर्वीच्या मानव तस्करी प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली. वास्तविक त्याला लगेचच याप्रकरणी ...

Salman Khan's first 'Ax Girlfriend' was raped in the age of thirteen! | सलमान खानच्या ‘या’ पहिल्या एक्स गर्लफ्रेंडवर वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता बलात्कार!

सलमान खानच्या ‘या’ पहिल्या एक्स गर्लफ्रेंडवर वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता बलात्कार!

प सिंगर दलेर मेहंदीला १४ वर्षांपूर्वीच्या मानव तस्करी प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली. वास्तविक त्याला लगेचच याप्रकरणी जामीनही मिळाला. आता तुम्ही म्हणाल की, ही बातमी नव्याने सांगण्याचे कारण का? तर बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे, जी मानव तस्करीसारख्या गंभीर घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांसाठी ‘नो मोर टियर’ या नावाने एक संस्था चालविते. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, सलमान खानची गर्लफ्रेंड राहिलेली सोमी अली आहे. 

पाकिस्तानी वंशाच्या सोमी अलीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, मी विविध प्रकारचे अत्याचार सहन करीत मोठी झाली आहे. जेव्हा मी पाच वर्षांची होती तेव्हा माझे लैंगिक शोषण करण्यात आले. १२ वर्षांची असताना मी यूएस शिफ्ट झाली. तेराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार केला गेला. मला लहानपणापासूनच अशाप्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागले, शिवाय मी या घटनांची साक्षीदारही राहिली. त्यामुळे मी अशा गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या महिला, पुरुष आणि मुलांसाठी काहीतरी करू इच्छित होती. 



दरम्यान, २००७ मध्ये सोमीने ‘नो मोर टीयर’ ही संस्था सुरू केली. ही संस्था अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना मदत करण्याचे काम करते. सोमी ही संस्था मियामी येथे चालविते. कारण मानव तस्करीत हे शहर अमेरिकेत सर्वांत आघाडीवर आहे. याच शहरात संस्थेच्या माध्यमातून सेक्स ट्रॅफिकिंग आणि याच प्रकारचे इतर गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या लोकांसाठी काम केले जाते. याविषयी सोमी सांगते की, बºयाचशा महिलांना मीडिल इस्ट, साउथ एशिया आणि जगातील इतर भागांतून खरेदी करून यूएसमध्ये आणले जाते. या महिलांना पुढे सेक्शुअल आणि फिजिकल वायलेंसला बळी पडावे लागते. 



सोमीच्या मते, गेल्या दहा वर्षांमध्ये तिच्या संस्थेने हजारो महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या चेहºयावर हास्य फुलविले. यामध्ये बºयाचशा विवाहित महिलांचाही समावेश आहे. ज्यांना त्यांच्याच नवºयांनी सेक्ससाठी विकले, तर बºयाचसे असे तरुण-तरुणी आहेत, जे आपल्याच घरात लैंगिक शोषणाला बळी पडले. यामध्ये भारत, पाकिस्तान या देशांमधील तरुणांची संख्या अधिक आहे. 



दरम्यान, एका जुन्या मुलाखतीत सोमीने सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना म्हटले होते की, सलमान माझा पहिला बॉयफ्रेंड होता. परंतु ऐश्वर्या राय आमच्यात आल्याने त्याच्याशी माझे नाते तुटले. विशेष म्हणजे मी जेव्हा सलमानच्या प्रेमात पडली तेव्हा टीनेजर होती. सलमानच्या प्रेमापोटी फ्लोरिडातून मी भारतात आली. त्याच्याशी लग्न करता यावे म्हणून मी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न करता येत नसल्याने मी त्याच्याशी फार काळ नाते टिकवू शकले नाही. पण आज मला माझे पहिले प्रेम माझ्यापासून दूर झाल्याचे अजिबात दु:ख वाटत नाही

Web Title: Salman Khan's first 'Ax Girlfriend' was raped in the age of thirteen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.