​‘टायगर जिंदा है’साठी सलमान खानचा ‘असा’ आहे डाएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 13:56 IST2016-12-31T13:56:43+5:302016-12-31T13:56:43+5:30

सलमान खान त्याच्या ‘फिट-अँड-फाइन’ बॉडीसाठी प्रसिद्ध आहे. भाईजान जेव्हा शर्ट काढतो तेव्हा चित्रपटगृहात एकच कल्ला होतो. पण प्रेक्षकांची अशीसुद्धा ...

Salman Khan's 'Aaa' for 'Tiger is alive' is Diet | ​‘टायगर जिंदा है’साठी सलमान खानचा ‘असा’ आहे डाएट

​‘टायगर जिंदा है’साठी सलमान खानचा ‘असा’ आहे डाएट

मान खान त्याच्या ‘फिट-अँड-फाइन’ बॉडीसाठी प्रसिद्ध आहे. भाईजान जेव्हा शर्ट काढतो तेव्हा चित्रपटगृहात एकच कल्ला होतो. पण प्रेक्षकांची अशीसुद्धा मागणी पूर्ण करण्यासाठी मात्र त्याला डाएट आणि व्यायामाच्या प्लॅनचे कठोर पालन करावे लागते.

सलमान सध्या ‘बिग बॉस’ आणि कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. हा २०१२ साली आलेल्या ‘एक था टायगर’चा सिक्वेल आहे.

पुन्हा एकदा टायगरच्या भूमिकेत जाण्यासाठी भाईने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सलमान सध्या कमी कॅलरी असणाºया डाएटवर आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलमान सध्या लो कॅलरी असणारे जेवण घेत आहे. हॉटेलमध्ये गेल्यावरदेखील तो खास पद्धतीने तयार केलेल जेवण आॅर्डर करतोय.

सलमानला सर्वाधिक काय खायला आवडते हे तुम्हाला माहित आहे का? बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या भाईजानला त्याच्या आईने बनवलेली पिवळी डाळ सर्वात जास्त आवडते. तो म्हणतो, ‘राजमा-चावल, पोळी-भाजी असे एकदम साधे जेवण मला आवडते. प्रक्रीया केलेले आणि साखरेच जास्त प्रमाण असणारे जेवण मी टाळतो.’

Low Diet

‘फिटनेस फ्रीक’ सलमानने नुकतेच एक मोबाईल अ‍ॅपसुद्धा लाँच केले आहे. त्याद्वारे चाहते त्याच्या सदैव संपर्कात राहणार शकतात. तसेच आपल्या लाडक्या अभिनेत्याविषयी रंजक माहिती, त्याचा डाएट, व्यायामाबद्दल टिप्स असे सर्व काही जाणून घेता येणार आहे.

Web Title: Salman Khan's 'Aaa' for 'Tiger is alive' is Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.